पत्रकारिता ही केवळ बातम्या गोळा करण्याची प्रक्रिया नसून ती समाजाचा आरसा असते. हा आरसा स्वच्छ, निर्भीड आणि प्रामाणिक ठेवण्याचे काम जे मोजके पत्रकार सातत्याने करतात, त्यात ‘HELLO सिंधुदुर्ग’चे संपादक सागर दत्ताराम चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या पत्रकारितेतील सातत्य, धाडस आणि सामाजिक जाणीव याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने त्यांना “उत्कृष्ट पत्रकार” पुरस्कार जाहीर केला आहे. हा सन्मान म्हणजे सत्याशी निष्ठा राखणाऱ्या पत्रकारितेचा गौरव आहे.
काळ बदलतो, माध्यमे बदलतात; पण बातमीची भूक मात्र कधीच कमी होत नाही. ही भूक वेळेत, अचूक आणि आपल्या आसपासच्या घडामोडींची असते—हे ज्या पत्रकाराने सर्वात आधी ओळखले, तो म्हणजे ‘HELLO सिंधुदुर्ग’चा संपादक सागर चव्हाण. लोकल कंटेंटच्या ताकदीवर सॅटेलाईट चॅनल्सनाही धडका देणारा हा पत्रकार आज अनेकांसाठी “बातम्यांचा राजा” ठरला आहे.
लोकल न्यूजला दिलेली खरी पॉवर
एक काळ असा होता की बातमी म्हणजे मोठ्या शहरांची, मोठ्या नेत्यांची किंवा मोठ्या स्टुडिओची मक्तेदारी मानली जात होती. मात्र सागर चव्हाण यांनी ही संकल्पनाच मोडीत काढली. लोकल न्यूज म्हणजे दुय्यम नाही, तर तीच खरी बातमी आहे, हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले. गाव, वाडी-वस्ती, सामान्य माणसाचा प्रश्न—यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांनी लोकल कंटेंटला खरी पॉवर दिली.
‘आजची बातमी आज’ ही सवय लावणारा पत्रकार
“बातमी म्हणजे कालचं वर्तमान” ही जुनी धारणा मोडीत काढत सागर चव्हाण यांनी प्रेक्षकांना आणि वाचकांना एक नवी सवय लावली—आजची बातमी आज, आत्ता. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून क्षणाक्षणाला अपडेट देत त्यांनी लोकांच्या हातात ताज्या बातम्यांचा मोबाईल दिला. त्यामुळे प्रेक्षक केवळ बातमी पाहणारा राहिला नाही, तर बातमीच्या प्रवाहाचा भाग बनला.
मोबाईल जर्नालिझमची ताकद ओळखणारा दूरदृष्टीचा पत्रकार
आज मोबाईल जर्नालिझम ही संकल्पना सर्वमान्य झाली आहे; पण कोविडपूर्वीच या माध्यमाची ताकद ओळखणाऱ्यांमध्ये सागर चव्हाण अग्रणी होते. महागडे कॅमेरे, मोठे युनिट्स यांवर अवलंबून न राहता मोबाईल म्हणजेच न्यूज रूम ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. एका मोबाईलच्या माध्यमातून थेट, जलद आणि विश्वासार्ह बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याची क्रांती त्यांनी घडवली.
डिजिटल जर्नालिझमला कंटेंटचा ‘पॉवर बूस्टर’
डिजिटल माध्यमात केवळ तंत्रज्ञान महत्त्वाचे नसते, तर कंटेंटची धार निर्णायक ठरते. सागर चव्हाण यांनी हे नेमके ओळखले. सनसनाटीपणापेक्षा तथ्य, वेगापेक्षा विश्वासार्हता आणि व्हायरलपणापेक्षा मूल्य—या त्रिसूत्रीवर आधारित कंटेंट त्यांनी दिला. त्यामुळे डिजिटल जर्नालिझमला केवळ पोहोच मिळाली नाही, तर विश्वासाचाही पाया मजबूत झाला. म्हणूनच त्यांची पत्रकारिता म्हणजे डिजिटल जर्नालिझमसाठी एक कंटेंट पॉवर बूस्टर ठरली.
सॅटेलाईट चॅनल्सना लोकलमधूनच आव्हान
मोठ्या सॅटेलाईट चॅनल्ससमोर उभे राहण्यासाठी प्रचंड भांडवल लागते, अशी समजूत असताना सागर चव्हाण यांनी लोकल कंटेंटच्या जोरावरच ही लढाई जिंकली. स्टुडिओपेक्षा रस्त्यावरची बातमी, पॅकेजपेक्षा प्रत्यक्ष घटना आणि स्क्रिप्टपेक्षा वास्तव—या बळावर त्यांनी सॅटेलाईट चॅनल्सनाही धडका दिला.
नव्या पिढीसाठी दिशादर्शक
आज अनेक तरुण पत्रकार मोबाईल हातात घेऊन फील्डवर उतरतात, डिजिटल प्लॅटफॉर्मवर निर्भीडपणे बातमी देतात—यामागे सागर चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. त्यांनी दाखवून दिले की, लोकल असणं ही मर्यादा नसून तीच खरी ताकद आहे.
लोकल कंटेंटला ग्लोबल ताकद देणाऱ्या, डिजिटल जर्नालिझमला आशयाची धार देणाऱ्या,आणि ‘आजची बातमी आज’ ही सवय लावणाऱ्या या ‘बातम्यांच्या राजा’चे मनःपूर्वक अभिनंदन!
Comments
Post a Comment