रूजवात

रुजवात...
एक सुरुवात..
नव्या जाणीवेची...
नव्या स्पंदनाची...
नव्या ओळखीची..
नव्या मी पणाची....
नव्या विचारांची...
नव्या सुरुवातीचीच ही रुजवात...
रुजवात.. खर तर हा एक मालवणी शब्द.... नवी सुरुवात, नवी पालवी याचा समानार्थी शब्द...
ब्लॉग ला काय नाव द्याव, पहीलं काय लिहाव याचा विचार करताना पटकन जाणवल, आठवल... रुजवात...
सार संपल अस वाटत असताना जगण्याची उमेद संपत नाही...
रोजगार संपला तरी हाताचं कौशल्य संपत नाही...
सार संपल असतानाही आपण ताठ मानेनं स्वताःसाठी पुन्हा उभे राहतोच ना,
तीच असते रुजवात...........
बस्स खुप झाल.......
आता फक्त रुजवात

Comments

Post a Comment