कुण्या देवदत्ताचा देवव्रत होताना...
ऋषी श्रीकांत देसाई
आज सात जानेवारी अर्थात, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस.. शिवसेना ते पुन्हा शिवसेना या प्रवासात आज दत्ता सामंत किती मोठे नेते झाले आहेत, यापेक्षा त्यांनी 'जनसामान्यांचा दत्ता' ही ओळख दरवर्षी तेवढीच घट्ट बनवली आहे हे महत्त्वाचे आहे.. याच घट्ट बनवलेल्या नात्यातून दरवर्षी सात जानेवारीचा दिवस हा, दत्ताने जमवलेल्या माणूसमेळ्यासाठी 'आपला माणूस आजही आपल्यासोबत' आहे ही भावना दत्ताला 'विजयी भव' म्हणत औक्षण करते !
दत्ता सामंताच्या पुढच्या वाढदिवसाला कदाचित 'आमदार दत्ता सामंत: ही ओळख रुढ झाली असेल.. पण त्या क्षणालाही दत्तांच्या जवळ असलेली माणसे ही खुप साधी आणि सामान्यच असतील हे आज ही घुमड्याच्या कातळावर कोणीही कोरुन लिहीलं तरी ते कायम राहील.. तुम्ही दत्ताला ओळखता का, या प्रश्नांच उत्तर नाही असेल पण दत्ताच्या देखी तुमची ओळख नक्की असते हाच सगळ्यात, विशेष गुण प्रत्येक सात जानेवारीचा असतो.
दादांच्या पहिल्या इलेक्शनपासून आज चार दशकांतला दत्ता यातला प्रवास समजून घेताना, मागच्या दहा वर्षात बॅकफूटवर राहून दत्ता जी बांधणी करत होता, ती त्याने एका महिन्यात सिद्ध करुन दाखवली. दत्ता फर्डा वक्ता नाही की त्याची सोशल मिडीया आणि पीआर टीमही स्ट्रॉंग नाहीय तरीही दत्ता कायम टॉप ट्रेंडिग असतो. तो गावखेड्यातला माणूस आहे . त्याचे प्रश्न आजही एसटी रस्ते साकव एवढेच प्राधान्यक्रमाचे असतात.. नेता म्हणून तुम्ही फाय जी आणि एआयच्या गप्पा मारणे लोकांना अपेक्षितच नाही.. लोकांच्या गरजांबद्दल बोला आणि ते पुर्ण करण्याबदद्ल बोला.. दत्ता हरल्यानंतर लढत होता , माणसं जोडत होता हे एक सूत्र जरी समजलं तरी बदललेल्या राजकारणात पुढे काय या प्रश्नांचे उत्तर मिळेल.
आत्ताच्या निकालात वाढीव मतदानाच्या टक्क्याची गणितं काहीही असतील , पण या सगळ्या प्रक्रियेत आमचो दत्ता आता आमदार होतलो हा जो अंडर करंट होता तो बेफाम होता. आणि तो प्रॉपर वर्क झाला हे ही तेवढंच खरं.. शेवटच्या क्षणी वाढीव मतदानातला दत्ता फॅक्टर समजून घ्याल तेव्हा अनेक गोष्टी खुप क्लिअरकट होतील.
पण तरीही दत्ताचे देवदत्त होणे आणि देवदत्ताचे मागच्या दहा वर्षातले देवव्रत अर्थात भीष्म होणे हे समजून घ्यायला हवं.. मी पुन्हा राणेपर्व आणेन ही भीष्मप्रतिज्ञा निर्माण करताना त्यांना अनेक चक्रव्युह भेदली, अक्षौहणींचे सैन्य आणले, आणि कुरक्षेत्रही जिंकले.. आज इव्हीएमने सहज जिंकता येणाऱ्या राजकारणात दत्ता आजही माणसे जोडतोय. मतं जोडतोय, मन जोडतोय , माणूस जोडतोय, गावं जोडतोय आणि जे जे जोडलं ते ते सगळं राखून ठेवतोय..
सोशल मिडीयावर चाललेल्या आजच्या राजकारणात दत्ता सामंत याचे राजकारण अजुनही पारंपारिक आणि मतदारांना माणूस म्हणूनच समजून घेणारे असते ही गोष्ट फार मोठी आहे. दत्ताच्या राजकारणातत्याचा ना कोण कधी दुष्मन असतो ना कधी कोण विरोधक असतो..
दत्ताच्या विजयी मोहिमेत त्याचा तो असतो.. त्याच्या धनुष्याच्या बाणाच्या टोकावर त्याचं लक्ष्यही अगोदरच निश्चित असतं.. आज चार दशक पाहिलेल्या दत्ताच्या राजकारणात तो फक्त सारथी असतो आणि त्याच्या रथावर विजयध्वज अटळ असतो. दत्ताबद्दल बावीस वर्षांपुर्वी दत्ता तिथे सत्ता ही टॅगलाईन होती, आज तीच टॅगलाईन मागच्या वर्षभरात लोकांनीच पुन्हा दत्ता, पुन्हा सत्ता अशी बदलून टाकलीय.
तुम्ही दत्ताला का विरोध करता याचे कारण विरोधकांकडे नसणे हेच दत्ताचे सगळ्यात मोठं यश आहे आणि त्याच वेळी दत्ता जिंकताना घेणारी शंभर टक्के मेहनत जाणवत जाणे हेही त्याचेच यश आहे. दत्ताच्या मेहनतीला तुम्ही जिथून पाहाल तिथून फक्त त्याच्या मेहनतीच्याच रुपात दिसते.. पण या सगळ्यात त्याने देवव्रताचे स्विकारलेले भीष्मपण हे खुप मोठे आहे. फक्त त्याने विकासगंगा पुन्हा आणीन हा स्वतला दिलेला शब्द होता..
आज जिल्हाप्रमुख दत्ता सामंत याचा वाढदिवस.. नव्वदच्या बॅचमधला टॉपचा विद्यार्थी आज कुलगुरुपदावर पोहोचलाय. मधल्या काळात त्यांने जे स्वताबद्दल ऐकलंय, अनुभवलय त्यावर त्याने विजय मिळवून आज तो खऱ्या अर्थाने देवदत्ताचा देवव्रत झालाय..
या देवदत्ताला आई घुमडाई जे लोकांच्या मनात अढळपद आहे ते देऊदे , आणि त्या अढळपदाचा अभिमान मिरवण्याची संधी त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला प्रत्येकाला मिळो याच शुभेच्छा..
Comments
Post a Comment