जनआंदोलन, सारचं अण्णाकलनीय !

खरतर आज हाच प्रश्न प्रत्येकाला पडलाय.. मत देऊन आपण चुक केली की मत न दिल्यानं ही चुक झालीय.. आज देश आणिबाणीसदृष्य परिस्थीती निर्माण झालीय.. अण्णा हजारे यांच्या वादळाचा झंझावात सा-या देशभरात फिरुनही एक प्रचंड शांतता आहे.. अस म्हणतात ज्यावेळी प्रचंड संताप होतो ना, तेव्हा राग डोळ्यात येतो आणि एक निरव शांतता फार मोठ्या भिषणतेला प्रसुत करतं असते..
आजही तसचं होतोय.. अण्णांच आंदोलन कधी संपेल, नाही सांगता येत. पण एवढ खर की प्रत्येकाच्या मनात आज देशभक्तीचे वारे वाहतायतं. भ्रष्टाचाराच्या किडीनं देश आज पोखरुन गेलाय. कॉंग्रेस पक्ष या सा-याची गंगोत्री आहे. आणि याच गंगोत्रीच्या पाण्याच्या कालव्यावर सारेच पक्ष पोसले गेलेयत हे ही तेवढचं खरच.. धुतल्या तांदळासारखं कुणीच नाही मग कुणाकडे पहायचं.. आठवा आपण खुप दुख झालं की दार बंद करतो आणि स्वताचाच चेहरा पाहत बसतो, त्याकडे पाहून रडतो आणि मग आपले अश्रु आपणंच पुसतो आणि चेह-यावर निर्धार करुन बाहेर पडतो एका नव्या विश्वासानं.. आजही तसच झालयं.. गेली पन्नास वर्ष भ्रष्टाचाराच्या या गाड्यात आपण पिचलोय रे.. आपल्या नेत्यानी अशी एक वस्तु गोष्ट नाही की ज्यात पैसा खाल्ला नसेल. ( मला नेमकं आठवत नाही पण सहा सात महिन्यापूर्वी महाराष्ट्रात चक्क शेण घोटाळा झाला होता म्हणे) असो, या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा एक आशावाद दिसला तो म्हणजे अण्णा हजारे..
अण्णा हजारे, सैन्यातून गावाकडे आलेल्या या तरुणानं आपल्या राळेगण गावाचा चेहरा मोहरा बदलला. आणि त्यानंतर विडा घेतला महाराष्ट्र सुधारण्याचा विडा.. महाराष्ट्र सरकारच्या सहा भ्रष्ट मंत्र्याना घरी बसवणा-या अण्णांना खरतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा.. पण तो पुरस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेनं मात्र त्याना देऊन टाकलयं.. अण्णांची प्रत्येक मोहीम ही शेवटी यशस्वी झालीय. ग्रामस्वच्छता असेल की दारुबंदी योजना असो सरकारला त्याची दखल घ्यावी लागलीय. काल कुठे तरी अंबिका सोनी म्हणाल्या की आमच्या सरकारनेच माहीती अधिकार संमत केला, पण बाईसाहेब हे विसरल्या तुमच्या सरकारच्या कपाळावर यासाठी मि-या वाटणारे कोण होते ? आठवा इतिहास (तसही त्याना गांधी नेहरु व्यतिरिक्त इतिहास आठवण म्हणजे अशक्यप्रायच म्हणा)
याच अण्णांनी आता जनलोकपाल बिल लढ्याला सुरुवात केलीय. खरतर याची सुरुवात झाली ती दोन वर्षापूर्वी.. अण्णांनी लोकांच्या मदतीने हा संग्राम सुरु केलाय.. एप्रिल महिन्यात ज्यावेळी हे आंदोलन करण्यात आले तेव्हा हे सोशल नेटवर्किगं वाल्या रिकामटेकड्यांचे काम अस म्हणत सत्ताधा-यानी हेटाळणी केली.. पण देशातली जनता राहूल गांधी शिवाय कोणाला तरी आयकॉन मानतेय हे पाहून कॉंग्रेस प्रवक्त्याचे धाबे दणाणलेयत.. पुन्हा अण्णांनी आंदोलनाची हाक देताचं सरकारने मात्र आपल्या पंजाच्या मुठी आवळल्या.. आणि कॉंग्रेसचा काळा चेहरा उघड झालाय.. हे मिडीयाचे आंदोलन आहे, एक व्यक्ती संसदेला आव्हान देतेय असा गळा काढण्याची अहमहिका नेत्यांमध्ये लागलीय.
अण्णांचा हा लढा कुठल्याही पक्षाविरुद्ध नव्हता. अण्णांनी सारेच पक्ष भ्रष्ट असल्याचे म्हणत सत्ताधा-यासह विरोधकांची ही गोची केली होती. पण जनतेनं अण्णांच्या पदरात झुकतं माप टाकत चौसष्ट वर्षापुर्वाचा इतिहास पुन्हा जिवंत केलाय....
संसदीय कायद्याला आव्हान देण्य़ाचा प्रश् निर्माण करणा-या सा-या सत्ताधा-याना एकच सवाल आहे, तुम्हीच सांगा घटनेत कितीवेळा आजपर्यंत बदल केलात? देशातले संसदेत बसणारे हे म्हणजे देश का?
अण्णांना अटकेत टाकल्यावर अभुतपूर्व असा जमाव उतरला त्यावेळी काय करत होते सरकार? आणि हि परिस्थीती नियंत्रणात आणण्य़ासाठी कॉंग्रेसचे युवराज याची परिपक्वता कोणी सांगेल का? मुळात राहूल गांधी यानी उत्तरप्रदेशमध्ये कलम 144 मोडून पदयात्रा केली तेव्हा सरकारनं सुरुवातीला का नाही धडक कारवाई केली? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातले एक ज्येष्ट साहेब म्हणायचे की, लक्षात ठेवा देशात आणिबाणी येईल तेव्हा हे घराणं पोराना उचलून परदेशात जाईल. दुर्दैवानं इतिहासाने ते वाक्य आज खर ठरवलंय.
मी मुळात कुठल्याही पक्षाच्या समर्थनार्थ हे लिहत नाही की कोणाच्या विरोधात लिहत नाही. कारण मला ठावूक आहे आज राजकीय स्थैर्य महत्वाचे आहे. आज असा एक सवाल विचारला जातोय कि एक अधिकारी येवून काय चित्र बदलणार आहे. त्या सर्वाना मला आठवण करुन द्यावीशी ती म्हणजे टी.एन.शेषन यांची.. शेषन येण्यापूर्वी निवडणूकांची किती भिती वाटायची. आज निवडणूंकाचा सामान्य माणसाला तुलनेनं तेवढा त्रास होत नाही तो केवळ शेषन याच्यांमुळे.. आज शेषन नसते तर निवडणूका आणि त्यांचा प्रचार किती त्रासदायक झाला असता याची कल्पनाही करवत नाही..
असो.. अण्णांचे आंदोलन एका चांगल्या कामासाठी आहे. त्य़ाला कृपा करुन कायद्याच्या जोखडात अडकवून संसदेला धोका असे शब्द वापरू नका.. कारण त्यातच तुमचे हित आहे.
जाताजाता मात्र एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे मराठी नेतृत्वाची... एका मराठी नेत्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे देश तोडणारा अशी प्रतिमा तयार झाली होती. त्याच महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं आज देश जोडून दाखवलाय.. हॅटस ऑफ अण्णा...
औरंगजेब बादशहा नेहमी एक गोष्ट सांगायचा, या मरगठ्याना कधीच दख्खनच्या वर यायला देवू नका... हे मरगठ्ठे एकदा का दिल्लीच्या तख्तावर आले तर द्रविड रजपूतांसह सा-याची मोट बांधून देशावर राज्य करतील... आणि आज हे खर ठरतय, एका मराठी माणसानं मरगळलेल्या देशवासियांमध्ये चैतन्य निर्माण केलय.. आणि या देशावर अधिराज्य गाजवणा-या मराठी माणसाचे नाव आहे, किसन बाबूराव हजारे...

Comments