थेट आणि लाईव्ह !

आज दिवसभर थेट सोहळा सांगून घरी जाताना तोच उत्साह दिसतोय या मिरवणुकीत.. रस्त्यांचे बदललेले मार्ग त्याचे वाचलेले ग्राफिक्स गर्दीतुन बाइक काढताना नाही आठवत राव ! गुलाल टाळा हे वाक्य जिभेवर गुलाल उडाल्याने नाही उच्चारता येत !! ढोल ताशांचा निनाद आता भोजपुरी गाण्यात थोडासा मंदावलाय ! निष्काम सेवेसाठी उभारलेले राजकीय पक्षांचे तंबू आता पेंगाळतायत.. नाचणा-यांभोवतीचे डोरखंड आता गर्दीला स्वताच ओढतायत .. ट्रयायपॉडवरचे कॅमेरे आणि खंबावरचे सिग्नल लुकलुकतायत शांतपणे ! तेवढ्यात सकाळी ज्याबद्दल भरभरुन बोललो तोच राजा समोर दिसतो..आपण आज तुझ्याबद्दल जाम भारी बोललो भावा अस सांगायला शब्द ओठावर येतात पण सांगणार कुणाला अस म्हणुन शब्दांचा थर्माकोल होतो .. पण त्याचवेळी त्या राजाचे एवढ्या गर्दीत फक्त मलाच पाहतात असा भास होतोय.. एवढ्या गर्दीत तुम्हाला ओळखणारा फ़क्त तो एक गणपती बाप्पा असतो..
आता ब-यापैकी गर्दी मागे टाकून घरी पोहचेन तोपर्यंत पुन्हा सिग्नल लागतो ..दुरवर पुन्हा सलग मूर्ती दिसतायतत .. माझ्या वडिलांची गणपती बाप्पा मोरया एकांकिका आठवतेय, आता सगळे गणपती समुद्रात जातील. मग रात्री सगळे एकमेकांला सांगतील आपण काय काय खाले ?? या गोष्टी खऱ्याच असतील कदाचित..
असो, पण एक मात्र नक्की थेट आणि लाईव्ह मध्ये खुप अंतर आहे.. हे अंतर तुम्ही कापायला निघालात की खुप जवळ जाता गणपतीच्या आणि त्यापेक्षाही स्वताच्या जवळ !!

ऋषी देसाई,
वृत्तनिवेदक, झी 24 तास

Comments