डोळयांन पाहिन रूप तुझे ! #1 मालवणचे स्वामी समर्थ निवास


आज स्वामींची पुण्यतिथी ! कोकणातले अनेक भक्त आवर्जून अक्कलकोट किंवा दादरच्या मठात जातात ज्यांना शक्य नाही ते स्वामींच्या मनात नाही म्हणून मनाची समज काढतात.. पण काही ठिकाण नजरेसमोर असूनही त्याठिकाणी आपले पाय वळत नाहीत.
मालवणला कधी आलात तर स्वामींच्या घराला आवर्जून भेट द्या.. मालवणात रांगोळी महाराजांच्या मठामागे चेतन मुणगेकर यांचे एक कौलारू घर आहे. या घरात स्वामींचे वास्तव्य आहे. स्वामींची काष्ठशिल्पातील मूर्ती स्वामींच्या प्रत्यक्ष नजरेसमोर तयार करण्यात आलेली आहे. या मूर्तीसमोर एकदा उभं राहा, साक्षात स्वामी पाहतायत हाच भास होईल..
व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या चेतनची स्वामी भक्ती अफाट आहे. छोटेखानी कौलारू घराचं आज मंदिर झालंय. पण अस असूनही हा परिसर प्रचंड साधा आहे. आज कुठेही जा स्वामींची छोटी मूर्ती असली तरी मार्बलचे जंगल असते पण या सगळ्यांत मुणगेकर यांचे हे घर तुम्हाला अध्यात्म श्रीमंतीची मालवणी नजाकत दाखवेल..
मालवणला आलात तर एकदा नक्की पहा !
श्री स्वामी समर्थ !!

Comments