#वाघ

कॉलेजात असताना एकदा
गिरसागरानी विचारल्यानी
वाघ काय करतो
मी सांगितलय "चावतो"
सगळो वर्ग हसलेलो
मी तरी काय करतलय
खरो वाघ खय मिया बघलय ?
तो चावता काय फांदळता बघला कोणी
मग सांगा माका वाघ कळतलो तरी कसो?
..
आयुष्य गेला आंगणेवाडीच्या जत्रेक
हुकात मान अडकवलेले
सगळीकडे मान हलवणारे वाघ बघीत
होय होय नाय नाय करनारो
तो वेलवेट मधलो वाघ तेवढो बघलय
मग सांगा माका वाघ कळतलो तरी कसो ?

..
नाय म्हणाक भरडार देवीच्या मागे पण बघलय
लालबुंद डोळे, लालबुंद जबडो
मग वायच तिरक्या होऊन बघायचा
आतून बल्प मारलेलो
तो लाल प्रकाश म्हणजेच वाघ समजत इलव
प्रकाशाच्या नादात तो जबडोच बघुक नाय
मग सांगा माका वाघ कळतलो तरी कसो ?
..
आठवला लहान आसताना
तशीलदार कचेरीत हाडलेल्यानी पकडून
पिंजऱ्यात ठेवलेलो होतो,
गोल फिरत गुरगुरा होता..
मी गेलंय जवळ त्येका फुल घालुक
तर पोलीसान हाकलल्यानं माका
मी फक्त इचारलय
ह्यो वाघ देवीजवळ नसता काय
हेका फुल घातला तर संतोषीमाता पावता मा ?
बोलाक कोणच नाय
हसले फिदी फिदी फक्त
मग सांगा माका वाघ कळतलो तरी कसो ?
..
आणि एकदा ना,
तिरवडयाक सर्कशीतले वाघ  पिंजऱ्यातसून
परत जंगलात जाताना रड रडा होते
तेंका जावचा नसताना
तेंका बापाशीपासून दूर न्हेय होते
तो आवाज आजूनय घुमता हा कानात
पण दुसऱ्या दिवशी पेपरात
ते रडत होते त्येची दुका मात्र
हाताक लागली नाय
मग सांगा माका वाघ कळतलो तरी कसो ?
..
गवळदेवाच्या खेळात
वाघ मधी एकटोच असता
दांडे घेवन अखो गाव आसता
देवाची प्रथा म्हणान परत वाघ
त्याच काठयेर लोंबकाळान फिरता
रीतीभातीतलो गवळदेवच आमकां ठावक नाय
मग सांगा माका वाघ कळतलो तरी कसो ?
..
मग शांत बसतय
नरभक्षक वाघिणीला मारल्याची बातमी सांगत
ग्रामस्थ सुखरूप आणि वनविभागाचे दावे सांगत
ब्रेक मध्ये चाय बरोबर टायगर बिस्कीट खात
आणि झोपताना टायगर बाम लावन
शोधतय वाघ कसो दिसत असतलो
हेचो विचार करीत डोळे ढाकतय
मग सांगा माका वाघ कळतलो तरी कसो ?

© ऋषी श्रीकांत देसाई

(जागतिक व्याघ्र दिनाच्या दिनानिमित्त सुचलेल्या या चार ओळी.. याला काय म्हणतात ठाऊक नाही पण कविता नक्की नाही.. डरकाळी नसेल ही पण तुम्हाला यातलं एखादं जरी नखं काळजाला लागलं ना तरी कमेन्ट करा)

Comments