तीथ

तर मंडळी, त्येचा झाला असा येकदा
तेव्हा ना, तिथींचा होता आपसात लय वाकडा

सगळ्या तिथींची आपापसात भांडणा
कोणच आयकना, कोणापुढे कोण नमना

चतुर्थी म्हणाली मी गणपतीची
एकादशी म्हणाली मिया पण विठोबाची

असा करत करत सगळीच इली सांगत
बिचारी  अमावस्या रवली मा ओ रडत

पुनवेकय मिजास आपल्या पूर्ण चंद्राची
सगळ्यांनीच केल्यानी भगल अमवाशेची

महत्व काय गो तुझा अमवाशाचा
पीडपिडून पोर रवला फक्त रडाचा

माकच कसा काय देवक नाय  देवानं
म्हणानं आमुषा गेला फणकाऱ्यान

गेला खय आमुषा शोधून सापडना
अंधाराच्या शोधात दियाकय माग गावं ना

शोधल्यार गमला फुगान बसला होता अंधारात
म्हणाक लागला माकच दिलास नाय काय अजिबात

देव म्हनालो तुका ख्येका होई देवाची जोडी
तुझी तर न चुकता कावळ्याची वाडी

तू म्हणजे पोरांच्या संकल्प व्रताची पिठोरी
तू म्हणजे सर्वपित्रीची आकीताची कटोरी

तू नेहमीच रवतलस मानान वरती
तुझी तर आजन्म लक्ष लक्ष दिव्यांची आरती

- ऋषी देसाई
३१/०७/२०१९

🙂 दीप अमावस्येच्या शुभेच्छा🙂

Comments