होऊर

भूगोल पासून जोग्राफी केलव,
सगळा पाठ करून शिकलव,
स्कुबातय खोल पाण्यात पेवलव,
आणि
होऊर मात्र शिकाचो रवतव..

अयंशी सालापासून देवबागाक लाटे झेलतव,
दरवर्षी नयीन बंधाऱ्याचे पडलेले दगड बघतव,
यंदा पाणी खूपच वाढला म्हणानं समाधान घालतव,
आणि
होऊर मात्र शिकाचो रवतव..

पुलाक वर टेकलेला भंगसाळीचा पाणी बघतव,
नुसकानीची बातमी बगून बाबा गे म्हणतव,
पाणी उतरला रे म्हणानं ओहोटीक कॅलेंडर शोधतव,
आणि, 
होऊर मात्र शिकाचो रवतव..

मागचोय तसलो, नयीनय तसलो म्हणानं फक्त बोटा मोडतव,
सगळीकडेच पाणी भरला म्हणान पडान रवतव,
घराभायर पाणी तरी मोबाईलात पूर डाऊनलोड करतव
केलड्याच्या घराची गोष्ट वाचत वाचत झोपतव,
आणि
होऊर मात्र शिकाचो रवतव

पावसात झिल भिजा नये म्हणानं सुट्टीचे फोनाफोनी करतव,
पाऊलभर पाण्यात व्हाळातन शिकाक गेलेले दिवस इसारतव,
दहावी झाल्यावर भूगोलाचा पुस्तक आठवणीने रद्दीत देतव,
आणि, 
होऊर मात्र शिकाचो रवतव 

देऊळ छप्परापर्यंत बुडाला रे म्हणत फोटो गावभर फॉरवरडतव,
होऊर म्हणजे 'कणा कविता' ह्या मात्र पाठ करून बसलव,
सगळा व्हावाला तरी झाला कसा   ह्या शोधात नाय पडनव,
आणि, 
होऊर मात्र शिकाचो रवतव 

ऋषी देसाई
मालवण

Comments