चित्र जिवंत होताना !

raja ravi varma
राजा रवी वर्मा म्हणजे रंगाचा जिवंत झालेला चमत्कार असायचा. त्यांच्या कालातीत असणाऱ्या चित्रकृती मागील वर्षी नाम संस्थेच्या केलेंडरसाठी पुन्हा रिक्रिएट झाल्यायत.. 
suhasini & maniratanam
नाम ही संस्था सुहासिनी मणीरत्नम यांची असून प्रसिद्ध छायाचित्रकार जी वेंकटराम यांनी आपल्या फोटोग्राफीतून हा काळ नव्याने जिवंत केलाय.. त्यासाठी दाक्षिणात्य अभिनेत्री यांची निवड ही लक्षवेधी आहे.
G venkatesh
चंद्रप्रकाशात बसलेली राधा श्रुती हसनला टिपलीय. प्रकाशाचा अद्भुत खेळ यात दिसतोय. दुसऱ्या छायाचित्रात नव्या बदलात  सज्ज असलेली स्त्री दिसतेय.. 
Shruti hassan

डोक्याला हात लावून हा विचारमग्नता साकारलीय नादियाने.. नाडीयाचे डोळे काहीसे वर्षा उसगावकरची आठवण करून देतात.
nadiya

सामंथा हे नाव जेव्हा गर्भारपणाची चावळ घेऊन हातात फळ घेऊन उभे राहते ना तेव्हा बातच और असते ! 
samantha 

रम्या कृष्णन दमयंती झालीय.. हंसाकडून नलाची गोष्ट ऐकताना उगाच फोटो बोलल्यासारखा वाटत राहतो..
ramya krishanan

मंदिरातून प्रसादाचे ताट घेऊन परतत असणारी खुशबू डोळ्यातल्या चमकेतून बोलतेय. 
khushboo

राजा रवी वर्मा यांचे एक मस्त चित्र आहे, देअर कमस पपा ! स्वताची मुलगी महापात्रा यांचे हे चित्र शोभनाला पाहताना महापात्रा उभी राहते
shobhana

पुडूकोट्टीची राणी ऐश्वर्या राजेशने साकारलीय.. यात जसा लाल साडी आणि त्याच्या जरीचा दिमाख आहे तसाच तो लिसी लक्ष्मीच्या पांढऱ्या साडीतील जरीकाठात दिसतो. 
Aishwarya rajeesh
lizzee
श्रुती हसन हिची कुरुपम संस्थानची राणी पाहिली की आकाशी रंगांच्या प्रेमात पडाल ! 

shruti hassan

तसेच काहीसा रंग जांभळा रंग लक्ष्मी मंचुला शोभून दिसतो.. तंजावरच्या लक्ष्मी विलास पेलेस मधल्या राणी चिमनाबाई यांचे करारीपण जाणवत राहते.
lakshmi macchu
त्रावणकोर संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाई यांच्या फोटोत पदराची स्टाईल आणि चित्रातला चेहरा साधण्यात चामुंडेश्वरीचे कसब आहे. आणि सरतेशेवटी आधुनिक बंगाली स्त्री चे रूप चितारताना कादंबरी ही उत्कट कलाकृती आहे. प्रियदर्शनी गोविंद ने कादंबरी सुंदर साकारलीय.
priyadarshani govind

जी वेंकट राम यांना खरंच सलाम !

Pc : naam & g venkatesh sir

Comments