वाट नसू दे गा देवा !


गोष्ट गावची आहे. 

तो तब्बल सात दिवस दरडीखाली अडकला होता.. गोव्यात जॉबला होता. गाळेलच्या रस्त्यावरुन आपल्या मठ गावी जात असताना अचानक  दरड कोसळली. जगण्याची आशा अशक्य होती पण दरडीखाली गीतेश नसेल असे सारखे वाटत होती.. जिथे तळईमध्ये एनडी आर एफ ने काम बंद केले त्याचवेळेला सातत्याने गाळेल मध्ये काम सुरू ठेवले आणि अखेर मठ गावच्या गीतेश गावडेचा आज मृतदेह सापडला..
गोव्याच्या बॉर्डर वर काठी नसती तर, जिल्ह्यातच जॉब असता तर असे खूप सारे प्रश्न उपस्थित होतायत.. वय वर्ष 28 असणारा गीतेशचा मृत्यू आज कुठलंच उत्तर न देता निघून गेलाय..  अखेर गीतेशचा मृतदेह सापडला या वाक्यानंतर ना कुठला निश्वास आहे ना कुठला सुस्कारा आहे..
पण खरं सांगू आता मुंबईत असलेल्यांची भीती नाही वाटत, गावची भीती वाटतेय. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक गोव्यात जॉबला जातात. त्यांना पत्रादेवी इथून प्रवेश बंद असल्याने दुसऱ्या वाटेने ये जा करावी लागतेय.. अर्थात या वास्तवाची आणि स्थानिक राजकारणाची नेहमीच फारकत असते किंबहुना त्यांना अनेक वेळा त्याकडे दुर्लक्ष करणे जास्त सोयीचे असते. त्यामुळे त्या कोणालाच ना प्रश्न विचारून फायदा ना उत्तर मागून !
आज दुःख एवढंच आहे की, आम्हीच आमच्या वाटा अवघड केल्यात. जबाबदारी दुसरे कोणीच घेणार नाही म्हणून आम्हीच आमच्या वाट्याला आलेल्या जॉबला जबाबदार ! सगळंच शब्दात नाही मांडता येत पण, दरवेळेला मुंबईक जॉबला परत येताना तुळशीला अगरबत्ती लावताना रडणाऱ्या पोरांची दुःख कळायला मुळात तुमचे गावात घर असायला हवं ना?

असो, आमचे दांडेकराकडून अपेक्षा नाहीत कसल्याच.. निदान वाटमार्गी का नाही वाट अडवत, हा एकच सवाल आहे आमच्या पोरांची ?

#श्रद्धांजली

Comments