दिलीपसाब

ए भाय.... कोई तो गाडी रोको

सिनेमे खूप पाहिले पण मशालचा तो सिन कायम।आठवत राहील.. प्रत्येक सुनसान रस्त्यावर !

गरजेला आपण एकट पडल्यावर तुम्ही एकटेच असता, दिलीप कुमार सारखे !

प्रत्येकाला दिलीप कुमार बनायचे असते, पण प्रत्येक जण एकच चूक करत गेला की तो दिलीप कुमार कॉपी करत गेला.. दिलीप कुमार ही डाऊनलोड करून घ्यायची गोष्ट आहे
नया दौरमध्ये धावणारा दिलीप कुमार शक्तिमध्ये अडखळून का पडला नाही  ?

देवदासवाला साधा देव हा राम और श्याम मधल्या राम पेक्षा साधेपणात का वेगळा वाटत राहतो.. साधेपणा दाखवतानाही एवढा फरक असू शकतो ?

दिलीपने सायराला निवडले की सायराने दिलीप निवडले ठाऊक नाही.. पण या लव्हस्टोरीने जो नवरा बायकोचा संसार दाखवला ना कधीच कुठल्या पडद्यावर नाही दिसणार 
काहीच आठवत नसलेल्या दिलीप कुमार समोर शर्मिला टागोर, वहिदा रहेमान उभी आहेत.. आणि स्मरणशक्ती विसरलेल्या दिलीप कुमार समोर सायरा बानू "ह्या बघ तुझ्या मैत्रीणी आल्यायत, त्यांच्याशी तरी बोल" असे एक बायको सांगते तेव्हा ते न्यूज फीड कधीच नसते..

आता सगळं बदललंय म्हणा.. काही वेळाने दिलीप कुमार चा तो परत सोशल मीडियावर युसूफ खान होईल म्हणा. मुळात दिलीपकुमार इंग्रजाविरुद्ध पुण्यात भाषण दिल्यामुळे येरवड्यात पण गेलाय हे कुठे आपल्याला माहीत असायला हवं म्हणा !

 पण 2014 पूर्वीही राष्ट्रप्रेम होतं ना त्यातला दिलीपकुमार दर पंधरा ऑगस्टला 'क्रांती' मधला आठवत राहील.. "ये देश है वीर जवानों का", "अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं" या गाण्याने अभिनयाने जिवंत ठेवलेलं देशप्रेम परत परत आठवत राहील !!
दिलीप कुमार हा डायलॉग साठी जेवढा प्रसिद्ध होता त्याच्या कैकपटीने पानभर लिहिलेल्या संवादाची एका क्षणात माती करायला एक नजर आणि एक पॉझ घेऊन जन्माला आला होता.. 

आज त्या नजरेच्या पापण्या मिटल्या आहेत

आणि पॉझही मोठा झालाय..

श्रद्धांजली दिलीपसाब !


Comments