सात जुलै समथिंग समथिंग..


खूप वेळा तारखा ना भूतकाळात कधीच जात नाहीत, दरवर्षी त्याच तारखेला पुन्हा जिवंत होतात.. ती तारीख मोठी होत जाते.. तुम्हाला कळों ना कळों ती तारीख तुमची वाट पाहत असते.. महाराष्ट्राच्या राजकारणात तर अशा कैक तारखा आहेत पण आजची तारीख म्हणजे अश्वत्थामा आहे, अश्वत्थामा..

सात जुलै ही केवळ आजची एक तारीख नाहीय.. मागच्या सोळा वर्षापासून धगधगत असलेली एक अखंड तारीख आहे.. तुम्ही आजच्या सात जुलैच्या प्रेमात असाल तर बरोबर सोळा वर्षापुर्वीची तारीख आठवत नसेल तर जा के देख रेकार्ड मे कॅलेंडरमे क्या है..


सात जुलै २०२१ ला आज सव्वासहा वाजण्याच्या सुमारास खासदार नारायण राणे यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.. दोन दिवसांपासून नारायण राणेंच्या मुंबईहून दिल्लीला जाण्याच्या प्रवासाची चर्चा सुरु आहे. पण दिल्लीला जाण्याचा हा प्रवास खुप मोठा आहे.. आजच्याच तारखेपासून सुरु झालेला सोळा वर्षांचा..

आजही तो दिवस क्रिस्टल क्लिअर आठवतोय. सात जुलैला २००५ ला नारायण राणे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्या घटनेला आज १६ वर्ष पूर्ण झालीयत.. त्या सात जुलैला राजकीय भुकंप म्हणजे काय हा शब्द त्याक्षणाला पहिल्यांदाच अनुभवत होतो. त्यानंतर काँग्रेसची पोटनिवडणूक, त्यानंतर विलक्षण राजकीय चढउतार.. सगळं सगळ काही पाहित असताना या गोष्टी आठवणे आणि आठवून लिहत राहणे हा खुप मोठा गृहपाठ आहे म्हणा !


नारायण राणेंच्या राजकारणात एक गोष्ट नक्की आहे, जी शिवसेनेत असताना होती, जी ते काँग्रसमध्ये असताना होती, जी ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात असताना होती,  आणि आज जे ती भारतीय जनता पक्षात असताना आहे.. ती म्हणजे नारायण राणे यांना मानणारा वर्ग हा त्यांच्या पक्षापेक्षा जास्त त्यांना मानतो.. त्यांच्या नेतृत्वाला जोडलेला जो पक्ष असतो त्याला मानणे हा आजच्या राजकारणातला खुप मोठा भाग आहे. आज नवे जुने किंवा समर्थक कार्यकर्ते असा भाग वेगळा नसला तरी राणेंचे समर्थक हा मोठा समुदाय त्यांच्या राजकीय प्रवाहाला समुद्र बनवतोय..

माहित नाही, सोळा वर्षापुर्वी सुरु झालेला प्रवास आज किती महत्त्वाचा आहे. कारण राणेंमुळे कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार झालेले कैक आहेत.  पण दादा आज स्वत मंत्री झालेत.. आणि आता जबाबदारी त्यांच्या समर्थकांची वाढलीय. दादा आता राष्ट्रीय नेते आहेत याची मानसिकता आता सगळ्यांनाच स्विकारावी लागणार आहे..



बाकी कोणी काहीही म्हणो, मी आजच्या दादांच्या या सोहळ्याच नितेश राणेंचे मर्यादपण आणि निलेश राणेंचे अमर्यादपण याला श्रेय जास्त देतोय. राजकारणातला आवाका हा जिवंत ठेवताना तुमच्या खेळी तुम्हाला तुमच्या नियमांना खेळाव्या लागतात. आज या सगळ्या खेळी या तिघांनी एकट्यानी मिळून जिंकून दाखवल्या आहेत. 


राणेंचे मंत्रीपदाच्या यादीत पहिले नाव हे अल्फाबेटकली किंवा रिजनवाईज नव्हते. त्यांच्या सिनयारटीने त्यांनी ते मिळवून दिलय. पण २०१४ पासून नारायण राणेंने आपलं वलय तसूभरही कमी होऊ दिलं नाही. 


लिहीण्यासारखं खुप काही आहे.. पहिल्या निवडणूकी्च्या मिरवणूकीत आमदार नारायण राणे नावाला विजयी होतांना पाहण्यापासून ते ९९ च्या मुख्यमंत्रीपदाच्या मिरवणूकीत सहभागी होणे जे जसे आठवतेय ना तसंच,आज स्टुडिओत बसून महाराष्ट्राचे खासदार नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधीचा सोहळा पाहणे खुप मोठी गोष्ट आहे..

बाकी ते एक वाक्य खरं आहे म्हणा..
"किस्मत की एक खास बात होती है, वो पलटती जरुरी है"



Comments

  1. श्री नारायणराव राणे साहेब ( दादा )यांचे हार्दिक अभिनंदन सहित शुभेच्छा🙏

    ReplyDelete

Post a Comment