और इस दिलमे क्या रखा है

साधारणपणे नव्वदचा काळ..
लहानपणी तेव्हा न समजलं जाणारे गाणे आणि कॉलेजच्या स्नेहसंमेलनात ज्या गाण्यावर हमखास डान्स फर्माइश असणारे हे गाणे समजायचंच नाही.. कसे काय कोणी या गाण्यावर डान्स करायचे खूप वर्षांनी कळलं ते सत्यनारायणाच्या पूजेला ओंकार स्वरूपा किंवा तुम्ही संत मायबाप वाजते ना त्या  सुरेश वाडकर यांचे हे गाणे.. 

एक एक गाणं म्हणजे मोबाईलची आजची प्ले लिस्ट आहे. 'लगी आज सावन की', 'मेघा रे मेघा रे', 'तुमसे मिलके', 'तू मुझे सुना' ही गाणी म्हणजे फक्त तुमच्यावर पडणाऱ्या कायम अवकाळी पावसाची लक्षण आहेत.. 'मेरी किस्मतमे तू नही शायद',  'ओ प्रिया प्रिया', 'देर ना हो जाये', 'मै हूं प्रेम रोगी', 'बोल राधा बोल', 'छोड आये हम' अशी गाणी म्हणजे ओल्या पावसात भिजून अंगावर घेऊन कुडकुडत बसणे आहे. या ओलेपणात पाहिले न मी तुला ऐकणे म्हणजे फुल्ल निमोनिया ना राव.. सगळं रानच आबादानी करतो आणि मग आपणच बसायचं 'पाठीवरची कमळ झाकत'.. 

म्हणजे एक समजते की अग अग पोरी फसली ग म्हणणारा माणूस सपने मे मिलती है म्हणू शकतो पण ए जिंदगी म्हणणारा आवाज आणि रंगीलामधील 'प्यार ये जाने कैसा है' मधला आवाज आहे हे शोधल्यावर कमाल वाटते ! सुरेश वाडकर यांची कुठली गाणी आठवायची आणि किती वेळा आठवायची हा प्रश्नच आहे म्हणा

बाकी काय बोलणार 'नमिला गणपती', 'महाराजा गौरीनंदना', 'विठू माऊली' तू ही गाणी कॅसेटच्या कव्हरावर देवाचा फोटो असल्याने देवासोबत अनेक देव्हाऱ्याच्या बाजूला वाडकरांनाही पूजतात म्हणा.. 

पण प्रश्न कायम आहे, कॉलेजच्या गॅदरिंगला पोर 'और इस दिलमे'वर कसे काय नाचायचे ? 


Comments