सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही काही अशी प्रतिभावान माणसं आहेत की ज्यांच्या वकुबापासून आपण अजूनही कोसो दूर आहोत. गंमत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द सोडली की या कलावंतामुळे महाराष्ट्र भरात जिल्ह्याची ओळख अजूनच उंचीवर नेणारी प्रगल्भ वाटते.. गंमत म्हणजे लोकांनी लोकांना समजून घ्यावी अशी माध्यम वाढलेली असतानाही ही माणसं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. वामन पंडित, डॉक्टर विद्याधर करंदीकर, अजय कांडर, प्रवीण बांदेकर, अशी खूप मोठी नाव आहेत.. याच यादीत बसणारे एक कणकवलीच्या मातीतलं ओले चित्र म्हणजे नामानंद मोडक सर..
अखंड नावाची एक संकल्पना घेऊन चित्र शिल्प कलेचा जागर हा माणूस निस्सीमपणे करतोय. मला आठवतय साधारणपणे वीस वर्षांपूर्वी नंबरात येणे ही ईर्षा नसून नामानंद मोडक यांनी बनवलेल्या ट्रॉफी घरात आणणे हा जो स्वार्थ आहे तो अनेक कलावंतांना विजयी भव म्हणत गेला..
कणकवलीतला नामानंद मोडक हा असा नामसाक्षात्कार आहे की जो दगड माती रंग आणि निसर्ग यांच्यावर प्रेम करायला शिकवतो. मुख्य म्हणजे मनातला प्रखर विरोध रंगवायला कधी कधी तरल रंगही किती जहालपणाचे काम करतात हे त्यांच्या कलानूभूतीतुन जाणवत राहते..
सिंधुदुर्ग शोधताना फक्त भूगोलात किंवा चवीत शोधून उपयोग नाही. अशा कलावंताना त्यांच्या प्रभावळीसह जाणून घेतल तरच मालवणी म्हणून कॉलर उडवत बेफाम जगण्याचे आयाम सापडतील !!
वाढदिवसाच्या शुभेच्छा Namanand Modak सर
Comments
Post a Comment