मन धागा धागा शोधते नवा !

आज नॅशनल हँडलूम डे !

मला या निमित्ताने त्या तिसरी का चौथीच्या भूगोलातील ओळी सारख्या आठवतात.  ' मठ, वजराट (वेंगुर्ले तालुका), कट्टा व सुकळवाड (मालवण तालुका)येथे हातमागावर कापड विणतात. कणकवलीचे हातमागावरील पंचेप्रसिद्घ आहेत.' 

हातमाग फक्त वाचलाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही पाहिलाय.. तुम्ही कोणी पाहिलाय का लहानपणी ? करूळ काच कारखान्याला सहल जाईल नेऊ नेऊ म्हणता तेही बघायचे राहून गेलं म्हणा.. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेना कुठे नक्की असेल, कुठल्या तरी घरात असेलच म्हणा हातमाग यंत्र. तुमच्या आहे का स्मरणात?

Comments