आजवळाची गोष्ट

 तर सण असता माहेरपणाचो, म्हणजे गौरी येता ना वर्षानंतर माहेराक.. पण ती येवच्या आधी आजवळाक नातवाक पुढे धाडता. माहेर चेडवाचा पण, नातू घर कधी ताब्यात घेता ता समजनाच नाय.. सगळ्या घराक त्याका ह्या होया आणि त्येका ता होया म्हणून सगळा गेल्या वर्षी घेतलेला असानय परत नइन खरेदी करूची हौस काय संपणा नाय. कोण कोणाक हाडुक सांगना नाय, पण सगळा कसा घरात नईन नईन वाटता...तेच्यात आटको पडता जुन्या गोष्टीचो.. वायच आंगाक पाणी लागला काय जा रूप चढता ना सांगाची सोय नाय
आता नातवाची गोष्ट.. हेंचे बाबा गजालीच भारी.. तेका माहीत हा आजयेकडसून पावने येतले. तो सरळ येवक पडलो हा ? ता बाकी कोनाचाच तोंड बघूचा नसता.. माका येताना नइन कापड होया मागता.. आजी आपली पाठवता. ता कापड बगल्यार मग हे आजवळाक येवक निघतले.. ता सुद्धा टक्लीर डोळ्यार कापड घेवन ! बरा तसे घरात जातील तर शपथ ना..  खळ्यात उभे रवतले.. आजयेनच कापड काढुक होया.. आणि मगे येरे बाबा असा म्हटल्यार मगे नातू घरात येतले..

बरा घरात इल्यार एका जाग्यार बसतले.. घरात काय चलला ता फक्त बघीत रवतले.. ऐकादो मोदकाक वाटेकरी घरात दुसरो वाटेकरी असलो तरी बारीक डोळ्यान बघीत बसतले. आणि मग तो आपलो आवशीक सांगतलो, हैतो आजयचो नातू वळयेतसून खयनय बगलय तरी माझ्याकडेच बघता.. आवस बिचारी काय बोलतली म्हणा. घरच त्या नातवाचा हा म्हणा ! 

बरा तो पाटावरलो नातू एकाच जाग्यार बसतलो, टेबलावरन खाली उतरा नये असा वाटत असला तर सगळा टेबल भरलेला दिसाक होया. वायचशी सुद्धा जागा रिकामी नको.. सफरचंद , मोसंबी, संत्री, केळी, पेढे, मोदक, नारळ, समई, तांदूळ. असा टेबल भरलेला होया.  लाल गव्हाचे मोदक आणि तांदळाच्या खीरीचो निवेद करायचो.. तो आजवळात रमलो काय मगे नातू आयेक निरोप पाठवतलो.. त्यामुळे तेंका काय होया नको ता व्यवस्थित बघूचा लागता.

मग बाबा माहेरपणाक चेडूमाय येतली.. नातू आजवळात असलो तरी गवर मायच्या माहेरपणाचा लाडाकोडाचा काय गे बाय सांगायचा.. भाजी काय आणि सोजी काय ! बरा तेच्यात आजवळच्या चेडवाक वर घरच्या आवशीची हातची भाकरी चपाती होईच.. थंय नातू पण पाच भाजी सोजीशिवाय जेवक उतरना नाय.  नातवाच्या बाजूक  आये असा घर बघत बसतत ओ..
हेंचो मान राखलो काय मग जावय बापू येतले. म्हणजे खयच्या खयच्या आजवळात नाय येनत.. पण जय येतात ना थंय ईचारा फक्त शंकरोबा म्हणजे काय जावयाचा कौतुक असता..  सगळा घर भरान वाहता.. पुरणपोळी गोडीची चव त्या दिवसाची औरच असता.. 
काय गंमत हा , नातू हिमालयाच्या टोकावरचो पण आठवणीनं खळ्यासमोरच्या कौलारू घरात आठवणीने येता.. गेल्यावर्षी शेवटपर्यंत हसलो नाय ओ.. तेंका ना घर  भरलेला होया.. पावणे रावणे इले नाय म्हणान शेवटपर्यंत हसलो नाय होतो.. आजी दुका गाळी होती, बाबू हसना नाय.. आणि नातू ईचारी होते रवले खय? फुडल्या वर्षी नाय दिसले तर बघा.. आजये नातवाच्या भांडणात भीतीक उमळ फुटलो होतो ओ... कोण नाय इले रे म्हणान सांगान नाय खात्री पटली तेची..  तर जाताना सगळ्या घरात पाटावर बसवन घर दाखवचा लागला ! नायच विश्वास बसलो तरी गेलो सांगान येतंय फुडल्या वर्षी म्हणान सांगान..


ही आजवळाची गोष्ट वर्षानुवर्षे अशीच सुरू हा.. तुमचा घर सख्या हा काय चौमती हा ठावक नाय.. तुमका कदाचित वाटत असात ता तुमचाच हा.. तसे कागदय असतील म्हणा.. पण उद्यापासून बघा ता घर ना फक्त तुमच्या आवशीक आजी मानणाऱ्या नातवाचा असता.. आणि कधीपर्यंत माहीत हा, जोपर्यंत त्याच्या पाटाखालच्या टेबलाबुडी पेल्यात ठेवलेले तांदूळ आजयेक वर्षभर पुराइतके फुलनत नाय तवसर !
ऋषि श्रीकांत देसाई 

#जगणेशोत्सव

Comments