राम जाने भाग दोन

मरना है इक दिन सबको मगर
ओ बेखबर तुझको क्या खबर
मरना है इक दिन सबको मगर
ओ बेखबर तुझको क्या खबर
क्या है तेरा अंजाम जाने
राम जाने राम जाने
राम जाने राम जाने

1995 ची गोष्ट आहे.. दिवाना, बाजीगर, अंजाम, डर आल्यानंतर अँटी हिरोची इमेज तशीच होती. त्यात राम जाने रिलीज झाला.. डीडीएलजे धो धो चालत होता आणि त्याचवेळी रस्त्यावरची गोष्ट रिलीज झाली.. शाहरुख टच झाला.. पुढे मग तो बादशाह झाला.. आणि एकदा का तुम्ही बादशहा झालात की तुम्हाला तुमचेच मारतात ही गोष्ट तर औरंगजेब काळापासून चालत आलीय..

शाहरुखचा पोरगा ड्रग्ज प्रकरणात सापडला गेलाय. आई बाप जाग्यावर नसताना,आणि थेट वकीली सल्ला ऐकण्याची समज नसताना एनसीबीने सगळ्या पुड्या बाहेर काढल्या. पहिल्या दिवशी हे प्रकरण दोन दिवस कस्टडी, मग वरच्या कोर्टात जामीन असे वाटले होते. पण आर्यन खान फसलाय. अर्थात अनेकांना इट्स परफेक्ट मीडिया लाँचिंग वाटतेय.. तो दावाही खोटा नाहीय.. अर्थात यात दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे तपास प्रॉपर झालाय त्यातून तो पुरता एक्सपोझ झालाय.. आणि दुसरी गोष्ट पुढची म्हणजे कोर्ट मॅटर,  त्याबद्दल मी न सांगावे आणि तुम्ही न ऐकावे ! पण बापाने कधी पोलीस रंगवला नसल्याने आयुष्यात पहिल्यांदा पोलीस पाहणाऱ्या आर्यनने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या धक्कादायक आहेत..

आर्यनने याचे खापर बापावर फोडलय.. मला शाहरुखसोबत बोलायचे असले तरी मला शाहरुखच्या मॅनेजरकडून परवानगी घ्यावी लागते.. अनेकांना हे आततायी वाटत असले तरी ही परिस्थिती आता खूप गंभीर आहे.. ते ड्रग्ज घेणे समर्थनीय नाहीच आहे, जाऊदेत चार वर्षे.. आणि तेवढंच कशाला ड्रग्ज घेतला म्हणून बापालाही शिक्षा करा, शाळेलाही दंड करा.. शिकवलं नव्हते का ड्रग्ज वाईट आहे म्हणून ? आणि या सगळ्यातून बाहेर पडलात की मग त्या बाप आणि लेक या नात्याबद्दल बोलूया !

चूक आर्यनची आहे, त्याला शिक्षा होणार पण शाहरुखने जो दंड भोगलाय तो जास्त मोठा आहे.. पठाण चे शूटिंग रद्द झालंय.. गौरी खानचा दौरा रद्द झालाय.. दोघेही आता साधारण साथीया चित्रपटात हतबल असलेले शाहरुख तब्बूच्या त्या हॉस्पिटल सिन सारखे हतबल आहेत.. पण ही गोष्ट आर्यनची तरी एकट्याची कुठेय.. बाकीचे चार पण त्याच वयाची आहेत.. आणि त्यांचे आई बाप काय करतायत, कोर्टाबाहेर बर्गर घेऊन येतायत पोरांना खायला घ्यायला... मीडिया तेच दाखवणार कारण तुम्हाला तेच बघायचंय.. दिल्लीचे पथक पूर पहायला काल दोन महिन्यांनी आले हे पहायला तुमच्याकडे वेळ कुठे आहे? प्रायोरटी तुमची बदललीय ना ?

आर्यनच्या करियरची सोय शाहरुख ठरवेल.. तो वाईट आहे म्हणून आर माधवनच्या मुलाला त्याचा स्पर्धक आपण का निर्माण करायचा. त्यांचे ते पाहतील. आणि तसेही त्या सगळयांना मीडिया स्टेटजी आणि इव्हेंट हा प्रकार जास्त समजतो.

या सगळ्यांच्या निमित्ताने हरवलेले पालकपण हा शाहरुखच्या करियरवर नाही तर आता मिडलक्लासच्या पालक नाते संबंधावर लेखाचे गुऱ्हाळ बनवणारा चोथा बनलाय. पण ड्रग्ज फक्त बोटी वर मिळते हा समज असेल किनारपट्टीवर काय चाललय हा न दिसणारा प्रश्न मोठा आहे. आणि राहिला प्रश्न पालक संबंधाचा तर एकच सांगा आमची पिढी अभ्यास केला नाही म्हणून काकांचा मार खाणारी होती. आणि चूक ते चुक म्हणून मार खाताना अजिबात लक्ष न देणाऱ्या आई वडिलांची होती.. आता ते शक्य आहे का ?

शाहरुख कायम रॉकेलवाल्या कुटुंबाची गोष्ट सांगून स्वतःच्या आणि आईचा प्रेरक संघर्ष सांगायचा.. आता ती गोष्ट सांगताना आर्यन आठवत राहील.. आणि हा विरोधाभास घेऊन यापुढे किंग खान ला समोर यावे लागेल. आर्यनचे काय करायचे ते शाहरुख ठरवेल पण मुलांमध्ये राम जाने पण यायला दरवेळी अनाथ असण्याची गरज नसते. नाती संपली की आपण अनाथ होतो.. आणि आज एका पोराने आपल्या बापाला 'टाकलंय' .. काल शराबी नावाचा सुपरस्टारचा सिनेमा होता, आज राम जाने नावाचा पिक्चर झालाय.. गोष्ट सुरुच आहे.... सुरूच राहील..


Comments