मरणही व्हावे 'पुनीत' !


पुनीत राजकुमार गेला..

कन्नडचा सुपरस्टार हार्ट अटॅकने गेला.. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी ! त्याच्या जाण्याची बातमी एवढी धक्कादायक आहे की कर्नाटकात आता कलम 144 लावल्याची घोषणा झालीय. काय प्रेम कमवतात ही माणसे..कारण माणसे ही मुळातच माणसासाठी जगतात!

पुनीतने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. पुनीतच्या जाण्याने कन्नड सिनेसृष्टीचे नुकसान झालंय पण त्याच्या सेवाधर्माची जाणीव गडद झालीय !

पुनीत 21 सुपरहिट सिनेमे दिले. पण हाच पुनीत 26 अनाथाश्रम चालवत होता. 46 मोफत शाळा चालवत होता. 16 वृद्धाश्रम चालवायचा, 19 गोशाळाचे चालवण्याचे मोठे कामही पुनित करत होता , आणि 1800 अनाथ मुलांचा पालक होता !


साऊथचा प्रत्येक स्टार मातीत रुजतो आणि माणसात जगतो..पुनीत आता आपल्याला दिसेल तो त्याच्या डब पिक्चरमधून.. पण नेत्रदान करूनही तो मात्र पाहत राहील 1800 जणांच्या नजरेतून !

#श्रद्धांजली

Comments