26/11 स्मरताना..

मुंबईच्या इतिहासात कधीही न विसरता येणारी ही तारीख.. झगमगणा-या या शहराने पहिल्यांदा काळोख आणि सुन्नपण अनुभवला होता. ज्याला पाहण्यासाठी अवघी दुनिया यायच्या त्या मुंबईत असं काही रक्ताचे ओघोळ वाहिले, असे काही स्फोटांचा विनाश झाले, असे काही लढणा-या माणसांचा धारातीर्थ देह पडले की जगणं अमर होईल.. असा काही दहशतीचा नंगा नाच सुरु झाला की भिती गारठून जाईल.. की त्या आठवणीची आठवण काढली तरी अजुनही ही धावणारी नगरी एक क्षण हादरुन जाते.. 

एका बोटीतून आलेली चार पाच माणसं अवघ्या शहराला, देशाच्या आर्थिक राजधानीला बंदुकीच्या दहशतीवर सुन्न करुन सोडतात.. २४ तासांचा दिवस असतो, पण नोव्हेंबरची ती २६ तारीख उजाड़ली होती तीच मुळी तब्बल ६० तासांच्या काळरात्रीचा सुर्यास्त घेऊन.. आज बारा वर्षानंतरही त्या आठवणी भळभळती जखम म्हणून वाहतायत..

26 /11 ची ही घटना म्हणजे सुरुवातील प्रत्येकाला अंदाधुंद गोळीबार वाटला.. पण नंतर नंतर घड्याळ्याच्या सरकणा-या काट्याबरोबर हा एक नियोजनबद्ध डाव होता यांची जाणीव सगळ्यांना झाली.. पण हे संगळ समजेपर्यंत परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली होती. 

आज बारा वर्ष उलटून गेलीत त्या घटनेला.. आठ महिन्यात मुंबई ठप्प होती. आता ठप्पपणाची भिती वाटत नाही की, अंधाराची भिती वाटत नाही.. पण जेव्हा जेव्हा २६ नोव्हेंबरचा दिवस उजाडतो तेव्हा एकच प्रश्न मनात भितीचे काहूर निर्माण करत सतावत राहतो की, २६ नोव्हेंबर २००८ ला असंख्य घाव झेलणा-या आणि शहरभर रक्त पाहणा-या माझ्या मुंबईंची चुक तरी काय होती..

#श्रद्धांजली

(कोल्हापूरमार्गे गगनबावडा उतरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असताना वैभववाडी जवळ हे शहीद विजय साळस्कर यांचे स्मारक आहे. ज्या ज्या वेळी समोरून जाल तेव्हा आवर्जून  थांबा, स्मरण करा.. पुढे जा )

Comments