राजा का बेटा !

मला अगदी मनापासून स्पष्ट वाटतंय, माध्यमांसमोर जाताना  दोघांनाही प्रचंड आत्मपरीक्षणाची गरज आहे. तुम्ही काय बोलणार हे सगळ्याना ठाऊक असते. अगदी स्पष्ट बोलायचे तर, तुम्ही बोलण्याअगोदर काय बोलणार याचा अंदाज लागेल याचा गृहितपणा आता सगळ्याना आलाय.."तो असाच आहे" मला ठाऊक आहे आणि "मी असाच आहे तुम्हाला ठाऊक नाही" ही विधान आपण कुठे करतोय, घराची वाटणी चाललीय का ? तुम्ही कुठल्या वाटेवर निघाला आहात हेच कळत नाहीय की अजून घर सोडवत नाही ते स्वतःला क्लिअर करा

हे बोलण्याचे कारण म्हणजे, बाकीचे सगळे  एकाबाजूला आणि तुम्ही दोघे एकाबाजूला.. तुम्हाला माध्यम म्हणजे काय ते ठाऊक आहे. तुम्ही समाजघटकांचे नेते आहात, स्वतःला आणि बोलण्यातल्या तुमच्या वकिलाला बाजूला ठेवून बोलण्याची गरज आहे. संघटनकौशल्यातील अपयश किती दिवस झाकणार आहात?  तुमच्या संघटनेपेक्षा एक असा वर्ग जो नेता म्हणून तुम्हाला पूर्ण पुरुषोत्तम म्हणून पाहतोय, त्याच्या पदरी जे दरदिवसाला अपयश पडतेय ते तुमच्या लेखीही नाहीय. ठाऊक नाही हे तुम्हाला कळतंय की कळत नाही.. कळत नसेल तर तुमचा तोटा आहे, नशीब एवढंच आहे की नफा दुसरीकडे वळत नाहीय.

माझ्यावर अन्याय झालाय हे किती वेळ वाजवणार आहे, तेच तुणतुणे वाजवायचे आहे तर मग प्रभू रामचंद्राचे नाव तरी घेऊ नका. सगळ्यात मोठा अन्याय तर खुर्चीवरून त्याच्यावर झाला होता, पण तरीही सत्तापद पुन्हा मिळवताना त्या शल्याचा उच्चार कधीही पुन्हा झाला हे उमजून घेतला तर वाटा प्रगल्भ होतील.

बदललेल्या राजकारणात कोणीच बहुमतात नसेल हे आता स्पष्ट झालंय, मग अशावेळी धनुष्यबाण नाही तर वाकबाण प्रभावी ठरतो या चाणक्यमूल्यांची उजळणी व्हायला हवी. बाकी तुमचे राजकारण किती वर्षे मागे गेलंय हे तुमचे तुम्हाला ठाऊक ! नियतीने जी अडीच वर्ष मिळाली आहेत त्यातून थोडंफार पुढे सरकण्याचा प्रयत्न करा,

बाकी तुम्ही आणि तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ ! काही करा अथवा नका करू तुम्ही हेडलाईन्स राहणार आहात ! जाता जाता एक गोष्ट सांगतो, मागील काही दिवसात त्या जगनमोहनची एक गोष्ट व्हायरल होतेय. बाप गेला पक्ष गेला तरी जिद्द नाही हरला.. त्याच जगमोहनची एक माहीत नसलेली गोष्ट सांगतोय !

सध्या जगनमोहन सत्तेत आहेत, पण त्यांच्या आईने त्याच्या विरोधात भूमिका घेतलीय. ती आता मुलाच्या विरोधात आहे, ही फूट त्याच्या घरात पडलीय. त्याची बहीण आणि आई लोकांसाठी रस्त्यावर उतरलीय.

आं‘प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या मातोश्री वाय एस विजयम्मा यांनी त्यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाची साथ सोडली असून, त्यांनी या पक्षाच्या मानद अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. आपल्या मुलीला आधार देण्यासाठी त्यांनी मुलाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मुलीने शर्मिलाने तेलंगणात नवीन पक्षाची स्थापन केली आहे. आंध्रात लवकरच विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. जगनमोहन रेड्डी यांचे बहिणीने राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर मतभेद झाले होते. अवघ्या वर्षभरापूर्वी बहीण शर्मिला यांनी वायएसआर तेलंगणा पक्षाची (वायएसआरटीपी) घोषणा केली होती. जगनमोहन आपल्या बहिणीच्या तेलंगणात प्रवेशाच्या विरोधात होते. वायएसआर काँग्रेसच्या मानद अध्यक्ष विजयम्मा यांनी नवीन पक्षाच्या स्थापनेप्रसंगी मुलीला आशीर्वाद दिला होता आणि मग त्यांनी तिच्यासाठी मुलाच्या पक्षाचे पद सोडले आहे.

काय करावे जगनमोहनने ? त्याच्या आईने अध्यक्ष असूनही पक्ष नाही फोडला. आणि बहिणीने भाऊ सत्तेत असूनही विरोधात जाण्याची भूमिका घेतली ना? काय वाटते तुम्हाला जगनमोहनला घर नाहीय का की त्यांच्याकडे वारसा संघर्षाचा नाहोय का ? की त्यांच्याकडे मुलाखतीला खाजगी वृत्त वाहिन्या नाहीयत ? कदाचित त्यांना हे ठाऊक आहे संघटना बांधावी लागते, रस्त्यावर उतरावे लागते, आणि हो दुसऱ्याचे लोक घेतले की त्या उपकारासाठी मनावर दगड ठेवावे लागतात !

बाकी दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा !

Comments