यारे या सारे या !

मागचे तीन महिने वांगडी आज उद्या घराक जावक निघतले.. कोण गाडी घोड्यान कोण टकलेवरसून ! दीड दिवस, पाच दिवस, अकरा दिवस सोताच्या घरात मुक्कामाक रवतले..

पण आज गणपतीची शाळा सोडताना आजूबाजूच्या गणपतीशी काय बोलत असतील ? रातभर गजाली करत असतील की शांतपणे सगळेच बाप्पा फक्त बघित असतील.. 


गंमत असता नाय, अवघ्या जगाचो कारभार बघणारा ह्या दैवत मातीच्या कणाकणातन लक्षावधी पाटावर साकारत जाता , पाटावर बसान रवता दोन महिने तरी जगाचो कारभार एवस्थित सुरू असता ! भायर निसर्ग रंगाक घेता आणि गणपतीच्या शाळेत  आपणाक होया ता पितांबर सोवळा दागिने डोळ्यातला काजळ सगळा सगळा होया तसा करुन घेता.. मोहाच्या ह्या दुनियेत अवघ्या जग घडवणारा ह्या दैवत 'मूर्ती घडवल्यान कोणी' म्हणून मूर्तिकाराचा कौतुक करुन घेता. तुमचा देवपण विसरान मूर्तिकाराचा घराघरात कौतुक करवून घेणा आणि ता गप्प रवान आयकणा म्हणजे खरा देवत्व आसा !
पण तरीही माझो प्रश्न कायम हा, जगाचा आयकनारा आज आपल्या असंख्य रुपाकडे कसो बघीत असात ? आजच्या राती घराक जावच्या आदि हे सगळे गणपती  एकमेकांशी काय बोलत असतील ? ज्या घरात जातंय त्या 'घराची मोठेपणा' तेपण साठत असतील ना? 

शेवटी कसा हा ना, तुमचा घर ह्या तुमचा नंतर आधी तेचा घर असता ना ?

- ऋषी श्रीकांत देसाई

Comments