फुटबॉल शूटबॉल



काल महाराष्ट्रातील फुटबॉलचा सामना पाहणाऱ्याच्या यादीत नव्वद टक्के तरी आयुष्यातील पहिल्यांदाच फुटबॉल सामना पाहत होते.. एखादी गोष्ट समजत नसेल की बारकाईने पाहण्याचे कसब जमुन जाते ना रसाळ प्रकार होता. त्यांना फक्त मेस्सी नाव माहीत होते. अर्थात त्या नव्वद टक्के मधील शंभर टक्के हे पहिल्यांदाच मेस्सीचा खेळ पाहत होते. त्यांना फक्त मेस्सी दिसत होता.  तसं तर सगळं जगच अर्जेंटिना झालं होतं आणि फ्रान्स बाजी पलटवेल असे वाटत असताना ज्याला पूर्णविराम करायचा होता त्यानेच केला. आणि संपूर्ण जगात एकच नाव ट्रेंडिंग झालं 'मेस्सी'


अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता बनला आहे. गतविजेत्या फ्रान्सला ३-३ च्या बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवत ३६ वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अर्जेंटिनाच्या मेसीने पेनल्टीवर पहिला गोल केला. दुसरा एंजेल डी मारियाने केला. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये किलियन एमबापेने ९७ सेकंदांत २ गोल केले. सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला. पहिल्या १५ मिनिटांत एकही गोल झाला नाही, पण पुढच्या १५ मिनिटांत मेसीने गोल करत अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. मग एमबापेने पेनल्टीवर गोल करत सामना ३ - ३ ने बरोबरीवर आणला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना जिंकला. अशा प्रकारे फुटबॉलमधील युरोपची जादूही २० वर्षांनंतर ओसरली. चषक युरोपच्या बाहेर गेला.


मेस्सी जिंकलाय, त्याने त्याचा पूर्णविराम शोधलाय पण आता इनिंग सुरु झालीय एम्बापेची ! ३५ वर्षीय मेसीने करिअरमध्ये सर्वात मोठी ट्रॉफी जिंकली. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून तो वरचढ राहिला. आता तो निवृत्ती घेत आहे. दुसरीकडे, केवळ २ वर्ल्डकपमध्ये १२ गोल करणारा एमबापे सध्या २४ वर्षाचा होणार असल्याने किमान ३ वर्ल्डकप खेळू शकतो. हा वेग राहिल्यास सर्वात यशस्वी खेळाडू बनू शकतो.


हा जो हरण्यानंतर जिकण्याची गोष्टीचा जो प्रवास सुरु होतो ना त्याचे नाव चालणे असतो.. आणि जो चालत राहतो त्यालाच गोल्डन बूट मिळतो.


- ऋषी देसाई

Comments