पेले


एडसन अरांतेस दो नासिमेंटो

नाव खूप मोठे आहे पण त्यापेक्षाही पेले हे दोन अक्षरी नाव जग व्यापून होते. फक्त पेले ही दोन अक्षरे नाहीत तर आणखी कैक विशेषण या नावाला टोपणनाव म्हणून जोडली गेली होती. ब्राझीलमध्ये  ‘ब्लॅक पर्ल’ , इटली व भारतात ‘पेले’ , चीन व चिलीमध्ये एल-पेलिग्रा , फ्रान्समध्ये ‘ब्लॅक ट्यूलिप’ , तर कुठे ‘दि नॉव्हेल्टी’, ‘सॉकर किंग’, ‘दि किंग’, ‘ब्ल्यू पार्क’, ‘ब्लॅक सीजर’, ‘फॅबुलस’, ‘डिव्हाईन’ अशा अनेक टोपण नावांनी पेले या माणसाशी स्वतःला जोडत स्वताचे सोने करुन घेतलं!

वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ब्राझीलमधील कोराकोसा या गावी रस्त्यावर भुईमुगाच्या शेंगा विकणारे पेले आज जग सोडताना केवळ एका देशाची नाही तर जगाची ओळख बनून गेले होते.  ब्राझीलची आणि फुटबॉलची जशी ओळख होती तशीच ती ब्राझील आणि पेले या नावाचीही होती. ब्राझील हा देश पेलेच्या नावामुळे ओळखला जाऊ लागला. दर दिवशी पेलेना अगणित चाहत्यांकडून अनेक पत्रे यायची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक वेळा पत्राच्या पत्त्याच्या जागेवर फक्त एकच शब्द लिहिलेला असतो ‘पेले’, बाकी पत्ता लिहिलेलाच नसायचा. हे प्रेम फक्त पेलेने कमावले होते !

ज्या वयात ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही किंवा मतदानाचा अधिकार नसतो त्या कोवळ्या 17 व्या वर्षी पेलनी देशाला विश्वचषक जिंकून दिला.आपल्या कारकिर्दीत त्यांनी 1363 सामने खेळले. पेले यांच्या नावावर तब्बल 1281 गोल करण्याचा विक्रम आहे. पेले यांनी आपल्या देशाला तीन वेळा फिफा वर्ल्डकप जिंकून दिला आहे. 

पेले वरचा चित्रपट आहे त्यात रहमानने जो मास्टरपीस दिलाय तो कधीतरी ऐका ! रहमानची सगळी गाणी एका बाजूला आणि जिंगा हे गाणं एका बाजूला ! 
 
To win you have to have ginga 1
Ginga, ginga oh
To win you have to have ginga
Ginga, ginga oh

पेले पाहणे आणि पेले समजून घेणे यात आयुष्यात आपण पेले बनण्याची एक ऊर्जा आहे.

त्या उर्जेला शतशः नमन !

Comments