ऐसा उलझा जिया

दिलीप कुमार यांचा नया दौर ही मागच्या काळाने पुढे फरफटत चालणाऱ्या भली मोठी गोष्ट होती. यांत्रिकीकरणात मनुष्यबळ नावाच्या गोष्टीचा तो संघर्ष होता. सत्तरच्या ती गोष्ट नव्वदीत फक्त दिलीप कुमारचा सिनेमा वाटायची. स्वतः मोठे झाल्यावर विज्ञान शाप की वरदान हा निबंध जगायला लागल्यावर मग तो सिनेमा आता जिवंत होऊ लागलाय. 

मनुष्यबळ ही गोष्टच आकुंचित पावल्यावर आता कृत्रिम बुद्धिमत्ता गिळायला बसलीय. आणि ती पहिली गिळणार एका पिढीला. सोशल मीडिया हेच आयुष्य मानून नफा, आर्थिक स्थिरस्थावर शोधणाऱ्या पिढीला पुढच्या काही वर्षात बसणारा धक्का फार मोठा असेल. अगदी सोप्या शब्दात आम्ही कॉलेजात असताना कॉम्प्युटर सायन्स हे भारी वाटायचं, चांगले जॉब असायचे, पण आता त्याचे संधी आणि उपलब्धता हा विषम प्रकार न झेपवणारा आहे. तसंच आता AI करण्याची दाट शक्यता आहे.

सोशल मीडियाच्या कंटेंट क्रिएटर साठी ही बातमी खूप मोठी आहे.
ChatGPT नंतर, OpenAI ने नवीन प्लॅटफॉर्म सादर केला आहे, जो टेक्स्ट व्हिडिओमध्ये रूपांतरित करू शकतो. कंपनीचे AI टूल तयार करणारा हा व्हिडिओ विशेषतः ब्लॉगर्ससाठी उपयुक्त आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ तयार करण्यासाठी फक्त मजकूर म्हणजेच स्क्रिप्ट लिहावी लागेल. यानंतर, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल स्क्रिप्टवर आधारित व्हिडिओ तयार करेल.

हे सगळं आता एवढं जवळच होणार आहे की त्याचीच सवय लागण्याची भीती आहे. आठवतंय का काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता त्यात हिरोईन रोबो असते पण ती भावला नव्हते.. पण सरकणाऱ्या काळाबरोबर 'तेरी बातोमे ऐसा उलझा जिया शिवाय दुसरे काहीच आवडत नाही तसेच झालंय, आणि कदाचित तसेच होईलही बहुतेक !

तोपर्यंत शाहिदसारखा कपाळावर उलटा हात फिरवत रहायचा बस्स !



#News #OpenAl #instagramreel #NayaDaur  #teribaatonmeinaisauljhajiya #socialimpact #DigitalSuccess #DigitalTransformation

Comments