आज सायकल दिवस..
एक काळ होतो, जेच्याशिवाय चैन नाय पडा
ठावक नाय आज खय हा
किती वर्षा झाली ती पण नाही आठवत
शेवटचे एकत्र कधी होतव
कधी हातातून सुटली..
पण लांब गेली इतक्या मात्र खरा
काय होती सायकल ?
एक सवय होती, एक गरज होती,
आणि एक रुबाब होतो
ह्याच पावसात हेरशी खळ्यात असलेली सायकल
घरात वर लोट्यावर यायची
फोक्सांक मडगाडाक आणि दांडक्याक
डिझेल लायत बसायची
सायकल तेव्हा फक्त सायकल नसायची ना..
हिरो पासून लेडीबर्डपर्यंतच्या त्या जगात
तेव्हा तीच आरएक्स हंड्रेड होती
मगे स्प्लेंडर आणि करिश्मा ईली
पण त्याच्या आधी तोल साधणारी
फक्त एक सायकलच होती..
कात्री करुन सायकल चालवतय..
हात सोडून सायकल चालवतय..
उलटा पायंडल मारतय…
चालत्या सायकलवर मधल्या दांडक्यावर बसान सायकल चालवतय..
ब्रेक नसतानाय सायकल चालवतय..
हे एकेकाळच्या वयात पराक्रम होते..
आणि एका हातात सायकल घेवन
चलत चलना ह्या डेअरिंग होता..
आता सायकला खय कोण चलवता
पण सायकल नसतानाय
पायडंला मात्र धावडवत नेतत…
आणि जा चलला हा तेका आर्ट ऑफ बॅलन्स म्हणतव !
Comments
Post a Comment