क्रिकेट पाहण्यासाठी ते समजण्याची गरज आहे हा सिद्धांत आयपीएलने पुरता संपवलाय. दोन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातला सामना खुप चर्चेत आला.. त्याचवेळी क्रिकेट न कळताही तू आया नही लाया गया है हा आवडता डायलॉग आठवला..
अर्थात मुंबई इंडियन्स म्हणजे शुद्ध क्रिकेट असला दावा नाही, पण ऐन निवडणूकीत भलताच मतं खातो आणि मित्रपक्षाला सीट कायमची मिळू नये म्हणून एक राजकारण खेळून निकाल येतो हा प्रकार माहीत आहे ना तसाच एक प्रकार नक्की झालाय का असे सारखं वाटत होतं..
विराटचे पाणावलेले डोळे आणि प्रिती झिंटाच्या खळ्या यात फायनल खेळवली गेली.. एका विजयाने मग उन्माद असा रंगवायचा की याअगोदर काही झालंच नाही असे दाखवायचं.. दोन दिवस आरसीबी आरसीबी जयघोष चालू झाला.. त्याच वेळी विजय मल्ल्याचा पोरगा आरसीबी जिंकताना बघून रडतोय हे व्हिज्युअल व्हायरल झाले.. अनेकांच्या मनात तोच प्रश्न डार्क झाला.. हा कुठून आला मध्येच..
तोपर्यंत वाचणाऱ्यांसाठी हेडलाईन्स सुरु झाल्या होत्या. Rcb wins, mallya returns : coincidence or calculated ?... दुसरी होती rcb win is good timing.. For more than just cricket fans.. आणि तिसरी तर भन्नाट होती.. From villian to victim- mallya’s pr redemptionarc
क्रिकेट तर फक्त नावाला होतं, खरा खेळ तर आज सुरु झालाय.. आरसीबीची हवा झाली आणि तीच लोकप्रियता पकडत परफेक्ट टाईमिंगला विजय मल्ल्याचा पॉडकास्ट आला. इमेज पॉलीश करायला खुप वर्ष लागतील पण रिब्रँड कसा उचलायचा तो रॉयल चॅलेंज ही हळदीची दारु बरोबर लोकांना कशी पचवायची हे ज्या मल्ल्याला कळतं त्याला शॅम्पेन टाईम कुठला असतो हे आपण सांगायची गरजच नसेलच म्हणा.. एवढा परफेक्ट टाईम कसा जमला हे फक्त पीआर क्षेत्रात जे कोणी असतील तेच सांगतील आणि जर कोणी याला योगायोग म्हणत असतील आपण फक्त त्याला दुर्दैवविलास एवढच म्हणू की.. सगळे दोषारोप जेटलीवर, प्रणव मुखर्जींवर पडलेत.. ते थोडेच आता स्पष्टीकरण देणार आहेत..
एका पॉडकास्टने काय होतं असे म्हणणाऱ्यांनी राज शमानीच्या फिगर इन आऊटच्या विजय मल्ल्यांच्या पॉडकास्टला सहा मिलीयन लोकांनी ऐकलय.. मल्ल्याची कॅलेंडर तुम्ही पाहू शकता आणि मल्ल्याला तूम्ही ऐकू शकता हा फरक त्या सहा मिलीयनमधला आहे. त्याची बाजू आता ती न्यायीक लढाईत त्याची साक्षीदारापूर्वीची विटनेस लिस्ट त्याची त्यानेच बनवून ठेवलीय. आरसीबीचा विजय आणि मल्ल्याचा मिडीया रिसरफेसींग हे तुम्ही कितीही नाकारलात तरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण एकाच वेळी अठरा वर्षानंतर संघ जिंकणे आणि नऊ वर्षानंतर मालक विजयानंतर मुलाखतीला बसणे.. हे फक्त कार्पोरेटमध्येच होऊ शकतं..
आणि हो, विजनवास म्हणजे वनवास नसतो बरं का…
Comments
Post a Comment