जग नाराज करेल पण नेटफ्लिक्स तुम्हाला नाराज करत नाही. नुकताच कोर्ट हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पहिला.
पूर्ण चित्रपट कोर्टरुम ड्रामा आहे. जिथे चित्रपट मुका बनतो तिथे तो जास्त बोलका होतो.
खरतर हा सिनेमा सैराट 2.0 कधीही बनला असता, पण राक्षसाना माणसाचा जन्म मिळाला आणि त्याची लढाई बदलली.
डेट ऑफ जजमेंटच्या दिवशी कुणाला तरी वकीलपत्र घालायचे असते तेही एका पूर्णपणे हरलेल्या केसमध्ये ! कोण जिंकतो आणि कोण हरतो हे कहाणीत पाहताना आपण उगाच जजपेक्षाही वरचे जज बनत राहतो. निकाल लावत राहतो आणि अशावेळी सतरा वर्ष 364 दिवस एकीकडे आणि अठरा वर्ष पूर्ण या एका दिवसाच्या फरकात अशी नेमकी काय मेंदूची वाढ होते की सगळे कायदे , आरोप, पुरावे, केसही बदलून जाते !
प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांदा , तिसऱ्यांदा वाचल्यावर त्यातील प्रत्येक शब्द वेगळा का जाणवतो हे हरिपाठ ऐकल्यावर जसे समजत नाही ना तसेच या गोष्टीत आहे.
कोर्ट हा चित्रपट हा एका फरफटीवरचा आहे, तो फटफटीवरचा नाहीय त्यामुळे त्याला स्पीडही नाहीय.. दोन अडीज तासाच्या सिनेमात आणि किती स्पीड देणार म्हणा ! फक्त मलाच कोर्ट सोडून खूप वर्ष झाल्याने आणि ईव्हीडन्स ऍक्ट बदलल्याने विटनेस प्रोसिडिंग प्रोसिजर मनाला पटत नाही..
पण तरीही हा सैराट बनला नाही याचेच काय ते कौतुक आहे.. त्यातील हिरोईन ही चित्रपटात आर्ची होईल अशी भीती वाटत असताना ती जाबिलीच राहिली, हेच स्रीदेवीच सगळ्यात मोठे यश आहे !
गोष्ट खरी की खोटी यासाठी आपण कोर्टाच्या पायरीवर जायचे नसते, पण ते खरं की खोटे हे ठरवायची वेळच का आलीय हे त्या पायरीवर उभं राहून शोधलं की केस समजत जाते. आणि त्यानंतर निकालाला का वर्ष जातात हेही कळेल !!
Comments
Post a Comment