आलेगडी लपीईयो... आलेगडी लपीईयो...

प्रिय मित्र सम्या यास,
चिरंजीव हो..
मुद्दामच असा आशिर्वाद दिला. मला माहीत तु कदाचित तु अंचबित होशील, बावरशील, रागावशील, ओरडशील पण नाही.. तु यातील काहीही करणार नाहीस.. मला ठावुक आहे. नाही, माझा ठाम विश्वास आहे तुझ्यावर.. तुला आज मी गंमत सांगणार आहे आपलीचं.. तुला आठवतय मी सारखं सांगायचो आपण अदृष्य व्हायचे आणि शोध घ्यायचा आपलाच.. आई, सुलभा मावशी या सा-या सा-याना माझ म्हणणं वेड्या सारख वाटायचं.. पण तुला मात्र ते पटायचं... आपणच आपला शोध घ्यायला सुरुवात करतो ना तेव्हा कळतं कि रक्ताची नाती किती क्लिष्ट वाटु लागतात.. मोहमाया दुर सारावीशी वाटतात आणि शोध घ्यावा माझ्यातल्या मीपणाचा... आपलेपणाचा शोध घ्यायला तुझ्या पुण्यातल्या पर्वतीवर येणा-या आजी आजोबा एवढ वय असाव लागत अस नाही किवा आमच्या पंढरपुरात येणा-या वारक-यांसारखी विरक्ती येणं मुळीच नाही...
आपलेपणाचा शोध घेण्याच्या प्रत्येकाच्या त-हा वेगवेगळ्या असतात.. ज्ञानेश्वरानी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.. शिवाजी महाराजानी तोरणा जिंकला तेव्हा त्यांच वय काय होतं रे.. फरक एवढाच रे आपण या कर्तृत्वाला पुराणाची आणि ईतिहासाची बंधन चिकटवितो.. खुप सैरभैर बोलत अस वाटतो काय रे तुला.. प्रॉब्लेम तुझा नाही आपल्या मेंटालिटीचा आहे.. रणरणत्या उन्हातुन सावलीत बसल्यावर वा-याची झुळुक मनाला शितलता देते.. पण मग पेपर वाचताना केवळ पान उडतात म्हणुन हाच वारा आपल्याला नकोसा का वाटतो.. गरज आणि नाती जास्त काळ नाही टिकत़ रे... गरज असो की नाती एक संपली कि दुसरी आपोआप हजर राहते.. दत्त म्हणुन... आपण उगाचच गुरफटतो रे हेच माझ शाश्वत नातं आणि हिच माझी शेवटची गरज असं म्हणुन नुसत धावत सुटतो रे.... काय मिळत रे शेवटी अपेक्षाभंगच ना.. विहीरीच्या काठावरुन विहीरीत डोकावल तर त्याला छान आकाशी किवां शेवाळी रंग दिसतो... फार मौज वाटते ना ते पाहिल्याव.. अरे पण आकाशी पाणी आभाळाच प्रतिबिंब आणि शेवाळी पाणी पाणगवताचा रंग रे... असो पाण्याचा रंग मात्र वेड लावतो रे...
बोलण्याच्या नादात काय सांगायला पत्र लिहीतोय ते सांगलच नाही.. अरे काल परवा तो विहीर पाहीला..छान आहे रे अगदी तुझी माझीच कथा... कदाचित आपलीच कथा असेल.. पण गंमत काय आहे ना ती आपलीच कथा आहे अस लिहायला जायचं तर त्याचे कथाकार सुमा भावे आणि गिरीश कुलकर्णी चिडायचे, विहीरची आपलीच पटकथा आहे म्हणुन.. सारेच चेतन भगत नसले तरी स्वामित्वाचा मान सोडायला कोणीच तयार होत नाही.. पण ती कथा आपलीच आहे रे.. आपल्याच अनुभवाचे माकेर्टींग करणारी... आयुष्यात अनुभव सा-यानाच येतात काहीना ते हरीपाठात सापडतात... काहीना वपुंच्या गोष्टीत... तर काहीना मुंबई मिरर मध्ये..
फक्त अनुभव ओळखता यायला पाहीजे.. आयुष्य़ातला प्रत्येक क्षण नवा धडा देउन जातो.. तो नाही ओळखता आला तर पुन्हा तोच क्षण येतो.. आणि मग ओऱडत सुटायचं, माझ राज्य वाचवा.. माझ राज्य वाचवा.. म्हणतं...
सारं शोधत फिरायचं..
इथही परत तिच गंमत आहे, मी म्हणायचो ना तुला... शोधणा-याला वाटत असतं सारे लपलेलचं असतीलं.. पण जर कोणी लपलेलच नसेल तर शोधणा-याला दिसुन सुद्धा कोण सापडणार... असो , खुप बोलतोय.. नाही रे पण त्याला काही नाही करु शकत आपण.. रक्तातल विष उतरवता येत मेंदुतल नाही येत... तुझ्या नच्यादादाच्या डोक्यात जी.ए आणि चि.त्र्यं नावाच विष भिनलय रे... हेच विष चाळण करतय माझ्या देहाची..
उमेशने हेच चितारलंय विहीर मध्ये... नाव जरी विहीर असलं तरी कहाणी विहीरी भोवती नाही फिरते.. ती फिरते आपल्याभोवती... आणि हे जग म्हणजे विहीरीचा काठ वाटु लागतो, आणि आपण उभं असतो.. त्या विहीरीच्या तळाशी वर काठावर पाहत.. नात्याचा अन स्वताःचा अर्थ लावत...
चित्रपट खरच छान आहे.. आयुष्याचा पट कसा मांडायचा हे आपल्याच हातात असत रे... नियती असली तरी सुद्धा... आणि हो नियती पट कधीच मांडत नाही.. नियती पट उधळते रे.. अमिताभ बच्चनची निर्मिती आहे. मला कमाल वाटते ज्याने मोहात अडकुन आपल्या देहाला एनआरआयची संज्ञा दिली तोच माणुस आज या विहीरीच्या तळाशी आहे... सर्वात शेवटी या चित्रपटाची क्रे़डीट लिस्ट पहाच... आजपर्यंत हा प्रकार कोणीच केला नाही रे.. आपण आपल्या आयुष्याचे शिलेदार फक्त स्वतःला मानुन ऋणनिर्देश संपवतो..पण वास्तवाच भान येत ना तेव्हा मग जीव गुदमरु लागतो.. रक्ताची नाती तोडुन पळावस वाटतं...
सम्या खुप बोलतोय रे..... अरे यार विषयच तसा आहे... जन्माला आल्यापासुनच आपण श्वास घेत असतो.. पण पाचवीत आल्यावरच कळत ना आपण ऑक्सीजनवर जगतोय ते, कळल्यावर भान येत ना... श्वासाचं... ऑक्सीजन हा शब्द कळण्याअगोदरही आपण श्वास घेतच असतो ना.. विहीरच ही तसच आहे... स्वताःच शोध घ्यायला सुरुवात केली की आपणच सावधान होइन स्वताला समजावतो...
आलेगडी लपीईयो... आलेगडीलपीईयो....
तुझाच अदृष्य

नच्यादादा


(अस म्हणतात लोकांची खाजगी पत्र वाचु नयेत.. तरीपण हे पत्र वाचायच असल तर विहीर पहा आणि नंतरच वाचा...हा पण नॉट एट होम बर का....)

Comments

  1. chhan lihilayas...me vihir pahilay mhanoon mhanatey... movie khup chhan vatati karan apalich watali... tu lekha hi chhan lihilays...tuzya lekhanat vividhata ahe...ani tyatun tuza sagalya vishayanvishyee asalela knowledge disun yeta.... style ter khupach awadali

    ReplyDelete
  2. जी ए आणि सुनीताबाईंची पत्रं वाचतोय असं मला वाटलं.
    का ब्लॉगलेखनातली विहीरच म्हणावं याला.
    सागर गोखले

    ReplyDelete

Post a Comment