डोळ्यानं पाहिनं रुप तुझे #2 परशूराम देवळातला आणि वास्तवात असलेला !


आज परशुराम जयंती. गेल्या वर्षी माझ्या डोळ्यानं पाहिन रुप तुझे या झी २४ तासच्या कार्यक्रमासाठी परशूराम मंदिराला भेट देण्याचा प्रसंग आला. आणि परशूरामाबद्दल खुप काही गोष्टी नव्यानं उलगडल्या.
चिपळूणच्या कशेडी घाटात असलेली परशूराम मंदिराची कमान पाहून पुढे जाणा-या बहुसंख्य चाकरमान्यापैंकी मी एक.. परशूरामाच्या ऐकीव माहितीतून आजपर्यंत समोर आला तो क्षत्रियांचे संहार करणारा आणि आईला मारणारा अशाच स्वरुपाचा एक कर्मठ ब्राम्हण एवढाच एक चिरंजीव ऋषी समोर आला होता. पण परशूराम म्हणजेच भार्गवराम मंदिर स्वता पाहिल्यावर समजलं कि या चिरंजीव दैवताला बदनामीचा प्रचंड मोठा डाव पसरला आहे.
परशूराम हे मुळात केवळ ब्राम्हणांचे दैवत आहे हा समज पहिल्यांदा पुसा. आज परशूराम जंयतीच्या निमित्तानं वंजारी समाज मोठ्या संख्येने येतो. महाशिवरात्रीला कोळी समाज दिंडी घेऊन येतो. एकादशीला वारकरी कोकण दिंडी घेऊन येतात.
हा भार्गवराम कुणासाठी राम आहे, कुणासाठी महादेव आहे तर कुणासाठी विठोबा आहे. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच
क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित केली.
मुळात एकुण तीन राम प्रसिद्ध आहे. पहिला परशूराम, दुसरा प्रभू राम आणि तिसरा यादव रामराजा. या तिनही रामांमध्ये परशूराम खुप वेगळा आहे. पुराणातला बाजूला राहू दे, पण शस्त्राला अस्त्र बनवणारा हा योद्धा आणि जमिनीला नांगरण्यापूर्वी जाळणं असो अशा अनेक ज्ञात गोष्टी आपण समजून घेतल्या तर क्षत्रविमर्दपेक्षा वाल्मिकींच्या शब्दातला राजविमर्द का आहे याचे संसदर्भ स्पष्टीकरण कळतं.
अनेकांना या माहितीवर परशूरामांबद्दल आक्षेप असतील कदाचित पण जमेल त्या प्रत्येकांन चिपळूणला असलेलं भार्गवरामाचे मंदिर नक्की पहा. चिरंजीव असलेल हे दैवत का चिरंजीव झालय आणि आईला मारणारा अशी हाकाटी पिटलेल्या भार्गवरामाच्या ठामपणे मागे उभी असलेली त्याची आई रेणूका तुम्हालाही कदाचित नव्याने इतिहास आणि भविष्य नव्याने सांगेल..
नक्की जा, चिपळूणच्या परशूराम मंदिराला..

Comments