'तेणे मज लावियेला वेधू'


१ फेब्रुवारी १९२९ .. कालनिर्णयकार जयंतराव साळगावकरांचा जन्मदिवस.

आणि आठ वर्षानी म्हणजे २०२९ ला जन्मशताब्दी साजरी होईल..आज 'कालनिर्णय' म्हणजे काय अभिमान आहे, ही गोष्ट महाराष्ट्राची प्रत्येक भिंत सांगेल ! मालवणात जन्माला येऊनही अमोघ मराठीपणाचा कळसाध्याय म्हणजे जयंतराव साळगावकर !

'व्यावसायिक होताना त्यात प्रामाणिकपणा कायम ओतत राहिला की विश्वासार्हता होते' साहेबांचा हा गुण घेतला की या परक्या शहरात एकटेपणा नाही वाटत ! ज्यानी ज्यानी मालवणच्या मेढ्यात हनुमान जयंतीला 'राम आणि हनुमान' कीर्तन ऐकलंय ना त्यांना जगात कोणीही परत राम समजावून सांगण्याची गरज उरत नाही. चानीच्या पाठीवरच्या वाळूच्या कणासारखे आपण कर्मशील बनतो. मुळात धर्म हाच कर्मात असतो तो समजला की परशुराम समजतो आणि हनुमंत आपल्याही वाटेत भेटत जातो. धर्माचे साधे सरळ तत्वज्ञान सोप्या भाषेत साळगावकरानी मांडले..

श्रीमहागणपती नावाची गोष्ट 'श्री' या एका अक्षरात असते आणि सहस्त्र अब्ज  आवर्तनातही नव्याने समजत जाते. धर्म कळायला हवा तर साळगावकर वाचायला हवे. बुद्धीप्रामाण्यवादाचा हा धर्मसिद्धांत साळगावकर यांच्या प्रत्येक शब्दात हरिपाठासारखा पुन्हा पुन्हा वाचावा.

जयंतराव साळगावकर फक्त 'ज्योतिर्भास्कर'नव्हते, ते 'ज्योतिषालंकार' , 'ज्योतिर्मार्तंड', 'विद्यावाचस्पती', ‘ज्योतिक कौस्तुभ’ होते. या सगळ्या पदव्यांनी साहेबांचा सन्मान झाला होता. पण तरीही ते स्वतः आणि संपूर्ण महराष्ट्रभूमीने त्यांना 'कालनिर्णय'कार म्हणून ओळखले. एकीकडे 'महाराष्ट्र रत्न' ही पदवी असूनही आयुष्यभर नावापुढे लागलेला कालनिर्णय हा किताब त्यांची खरी संपत्ती होती.

विचार हा देहानंतरही किती चिरंतन राहतो आणि मृत्यू पश्चातही तो संजीवन राहतो हा जयंतराव साळगावकर यांच्या नावाच्या उच्चारश्रीमंतीतला रत्नजडीत विचार आहे. आनी एकदा का आपण कृतकृत असल्याची भावना जागृत केली की डोईवरच्या आभाळातून अष्टकोनातून अष्टगणेश सिद्धी प्रदान करतात. जयंतराव म्हणजे माऊली समाधी आहे. नतमस्तक व्हावं आणि माऊली बनून अश्वथ पिंपळ व्हावे स्वताची सळसळ करत!

- ऋषी श्रीकांत देसाई

दिनांक : १ फेब्रुवारी २०२१

#पुण्यस्मरण
#जयंतराव_साळगावकर


Comments

  1. ग्रेट. ..मेल्या काय लिव्हर. ..वाचितच रवाना जालाहा.

    ReplyDelete

Post a Comment