इयेचि नांदो सत इशांचा सहकार !

सहकार चळवळ महाराष्ट्राच्या मातीने भारत भूमीला दिलेला एक सामूहिक श्रम शक्तीचा अजोड ठेवा. पुस्तकात वाचलेल्या रॉशडेल पासून ते प्रवरानगर पर्यंत आलेल्या या चळवळीने जगभर आपली व्याप्ती नेली असेल पण महाराष्ट्राच्या गावखेड्यात रुजलेल्या सहकाराने इथली भुईच नाही तर आभाळही रुजीव बनवलंय. सहकार या शब्दाने या प्रांतात पैसा रुजवला आणि माणसाच्या श्रीमंतीने गावकुसाची व्याप्ती प्रभावळ बनत गेली..

समुद्राच्या धडका सहन करत आणि सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भूमीतला सहकार आज अडतीस वर्ष या भूमीत आपली मुळे विस्तारत आज वटवृक्ष बनलाय. आजही ज्या भूमीत कुठल्याही सामूहिक संघटन बनताना जिथे मर्यादा ठसठशीत जाणवतात त्याच अपरांत भूमीतला प्रतिपश्चंद्रपणाचा नितळ तेजस्वीपणा म्हणजे काय हे जर एका वाक्यात सांगायचं असेल तर अडतीस वर्ष लांब असणारी आकाशगंगा स्वतचे नाव सांगेल 'सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक'

तो काळ विलक्षण होता. १९४७ नंतर सुधारणांच्या वाटा गावकुसातुन शहराकडे जात असताना ६० सालात महाराष्ट्र स्वतंत्र झाला. याच नव्या सुधारणाच्या वाऱ्यात १९८१ सालात किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने जिल्हा सिंधुदुर्ग हे नामाधिमान मोठ्या अभिमानाने मिरवू लागला. खारेपाटणपासून बांदा तिलारी पर्यंत पसरलेल्या या जिल्ह्याला खऱ्या अर्थाने एका सूत्रात बांधणारा अर्थबंध रोवला गेला तो १ जुलै १९८३ ला. अर्थव्यवस्था असा शब्दही ज्यावेळी प्रचलित नव्हता त्यावेळी सामान्य माणसाच्या देव्हाऱ्याची वीट रचली गेली.. 'बिना सहकार नही उद्धार' हा मंत्र जपत आंबा बागायतदार, काजू बागायतदार, नारळ बागायतदार, सुपारी बागायतदार , मत्स्यव्यावसायिक, व्यापारी, कष्टकरी, नोकरदार, बचतदार अगदी शालेय विद्यार्थीही एकवटला. माझी आणि माझ्या कुटुंबाची बँक म्हणत रुपयाला रुपया जोडत गेला. आणि निर्माण झाले पैसा म्हणजे विश्वास आणि विश्वास म्हणजे फक्त एकच नाव 'सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक'

सिंधुदुर्ग जिल्हयाच्या निर्मितीनंतर १ जुलै १९८३ ला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापन झाली. अस म्हणतात की पैसा असला की माणस आठवत नाहीत. पण त्या पैशाला सचोटी, निष्ठा आणि विश्वास शब्द जोडला की अढळपणा आणि अमूल्य वारसा मिळतो. सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव, प्रा. डी. बी. ढोलम यांच्यापासून विद्यमान अध्यक्ष सतिश सावंत या नावाने बँकेच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवले पण पैसा नावाच्या कांचनमृगालाही या भूमीत स्थैर्य दिले आणि बँकेशी जोडलेल्या प्रत्येक माणसाला एक अभिमान दिला. 

आज अडतीस वर्षांचा आलेख पाहताना नव्वदीनंतर या जागतिक मंदीची तीन स्थित्यंतरे, नोटबंदी, पेनेडॅमीक परिस्थितीतील ठप्प झालेलं अर्थकारण आणि तरीही एसडीसीसी नावाचा विजयी अश्वमेध त्याच्या टापाच्या पाऊलखुणात समजून घेतला पाहिजे. सिंधुदुर्ग बँकेने आपल्या प्रगतीचे उत्तरोत्तर टप्पे गाठण्यासाठी आजवरचे बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने जो एकसंघपणा दाखवलाय त्याच ३८ वर्षांच्या दीपाने उजळवून निघालेली ही सिंधुभूमीतील दिवाळी आहे !
आज ३८ वर्षाच्या या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आपले वेगळेपण जोपासताना विश्वास दृढ बनवत गेला हा एसडीसी नावाचा चमत्कार आहे! बँकेने ३८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून  अनेक नव्या उपक्रमांची मुहूर्तमालिका ओवलीय. 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१२ पासून कार्यान्वित केलेल्या सीबीएस प्रणालिचे पुढचे पाऊल म्हणून डेटा सेंटरची उभारणी होत आहे. मागील ९ वर्षामध्ये टेक्नोलॉजीमध्ये झालेले विविध बदल विचारात घेवून त्याअनुषंगाने अपग्रेडेशन व ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय मापदंड विचारात घेवून Tier III लेव्हलचे अदययावत असे डेटा सेंटरचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री मा. खासदार श्री. शरचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार आहे. आज बँकिंग क्षेत्रात सिंधुदुर्ग बँक उतुंग अशी भरारी मारीत आहे यासाठी सिंधुदुर्ग  जिल्हा बँकेचे  अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे संचालक मंडळ आणि प्रशासन तसेच बँकेचे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत सतीश सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्या पासून जिल्हा बँकेत आमूलाग्र बदल घडवून आणले. सीबीएस बँकिंग सुविधे अंतर्गत DBTL गॅस सबसिडी, प्रधानमंत्री जीवनज्योति विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ATM व्हॅन सुविधा, कॅश भरणा मशीन, POS/रेल्वे/IMPS/QR कोड असा कित्येक सुविधा त्यांच्या काळात सुरू झाल्या. अनेक कर्ज योजना जशा सिंधू घरकुल कर्ज, सिंधू पर्यटन निवास व न्याहारी कर्ज, सिंधू निवृत्ती वेतन कर्ज, सिंधू पगार तारण कर्ज, काथ्या उद्योग, धनवृद्धी शेळी पालन, दशावतार कलाकारांसाठी आगाऊ मानधन कर्ज योजना अशा अनेक कर्ज योजना सुरू केल्या.जिल्हा बँकेने सुरू केलेल्या अनेक योजनांमुळे आज कित्येकांना त्याचा लाभ घेता आला. जिल्हा बँकेच्या या प्रगतीत निश्चित पणे बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे श्री सावंत यांची कल्पकता जिल्हा बँकेच्या यशाला नवी झळाळी देत आहे आज डाटा सेंटर निर्मितीने जिल्हा बँक तेजोमय बनली आहे आज अदययावत डाटा सेंटर असलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राज्यातील एकमेव बँक ठरली असल्याने प्रत्येक जिल्हावासीयांसाठी ती एक अभिमानाची गोष्ट बनली आहे 

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये भात हे प्रमुख पिक असून बरीच शेतकरी कुटुंब भात उत्पन्नावर अवलंबून असतात. भाताला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी या पिकाकडे लक्ष देत नव्हते. मात्र गेल्या ३-४ वर्षामध्ये शासकीय आधारभूत किंमतीद्वारे मात खरेदी योजनेची चांगली अंमलबजावणी झाल्याने या पिकाकडे शेतकरी आता वळू लागले आहेत ही किमया सतीश सावंत आणि त्यांच्या संचालक मंडळाने केली आहे भात पिकास भाव मिळवून देणे आणि बळीराजाला आधार देणाऱ्या अर्थसंस्थेत जिल्हा बँकेचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. 

पीक कर्ज वाटप, बँक कर्मचाऱ्यांसाठी पगाराच्या १०० पट एवढया सुरक्षिततेचा अपघात विमा 'सिंधु बँक सॅलरी प्लस' योजनेअंतर्गत नोव्हेंबर २०२० पासून उतरविण्यास सुरुवात केली आहे. आता नव्याने बँकेच्या वर्धापन दिनापासून रू.१.०० लाखापर्यंतची ग्रुप मेडिकल विमा पॉलीसी सचिव व त्याच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात येत आहे. वीजबिल ग्राहकांना सुलभ व्हावे म्हणून  बँकेने स्वत:ची ब्रँच बीबीपीएस ही बिल पेमेंट सुविधा सुरू केलेली असून त्याद्वारे दि.०१ जुलै २०२१ पासून सर्व शाखांमध्ये विजबिले स्विकारणेत येणार आहेत. वर्तमानाचे गांभीर्य ओळखत कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे अनेक मुले अनाथ झालेली आहेत. यापैकी ज्या मुलांचे आई व वडील दोघेही निधन पावलेले आहेत अशी ११ मुले जिल्ह्यात आहेत. या मुलांच्या भवितव्यच्या दृष्टीने बँकेच्या वर्धापन दिनी या मुलांसाठी बँकेकडून आर्थिक मदतीचा हात दिला. जिल्हयातील दुर्लक्षित पिकांकडे शेतकऱ्यांनी बळावे यासाठी बँक दरवर्षी विविध फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देत असते. बँकेने वर्धापन दिनाचे औचित्य साधून या स्थानिक जांभूळ वृक्षांचे जास्तीत जास्त वृक्षारोपण करून शेतकऱ्यांना या लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याचा संकल्प सोडला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अडतीसावा वर्धापन दिन आज भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होतोय.डेटा सेंटरचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री मा. खासदार श्री. शरचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. तसेच या सर्व कार्यक्रमांसाठी मा. आमदार श्री. उदयजी सामंत (उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग), मा.खासदार श्री. विनायकजी राऊत, मा. आमदार श्री. दिपकभाई केसरकर (माजी गृह व वित्त राज्यमंत्री) व मा. आमदार श्री. वैभवजी नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

आजचा हा दिवस केवळ सिंधुदुर्ग बँकेच्या सभासद आणि कर्मचारी यांच्यासाठीच नाही तर अढळ विश्वास या शब्दांसाठी परिक्रमा करणाऱ्या सामान्य कष्टकरी माणसाचा मोठ्या झालेल्या पैशाच्या गोष्टीचा दिवस आहे.. अनेक डोळ्यात तेल घालून रात्रभर जागून जपलेला हा विश्वास आहे.. आजचा हा दिवस फक्त वर्धापनाचा नाही तर एका अढळ तेजोमय  सुरुवातीचा हा दिवस आहे ! हा दिवस अनेक वर्षांचा होवो याच शुभकामना !!


Comments