आ रहा हुं

आर्यन खानला आज जामीन मंजूर झालाय, उद्या त्याची सुटका होईल.. आणि काही क्षणात तो मन्नतला पोहचेल.. त्यानंतर दर शुक्रवारी एनसीबीला हजेरी लावील.. खटल्याचे काम सुरु होईल.. पण या सगळ्या अटकनाट्यात मागचे२५ दिवस जे महाराष्ट्राने पाहिलेली वेगवेगळी उपकथानके आहेत ती आता नव्याने स्वतंत्र तपासाचा विषय बनलीय..


मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना गुरुवारी 28 तारीखेला जामीन मिळाला आणि मागचे पंचवीस दिवस देशातल्या एका मोठ्या कहाणीचा कुठलाही चेहरा न दाखवता सुत्रनायक बनलेल्या आर्यन खानला आर्थर रोडचे दरवाजे अखेर खुले झाले. मागच्या तब्बल 25 दिवसांत घडलेल्या वादळी घडामोडींचा पहिला अंक आज संपला..


2 ऑक्टोबर 2021... देश बापूंच्या विचाराचे स्मरण करत असताना मावळतीला जाणारी संध्याकाळ मुंबईच्या समुद्रात एका भव्य आलीशान पार्टीसाठी सजत होती. त्या रात्री नेमक काय झालं माहित नाही, पण तीन ऑक्टोबरची सकाळ उजाडली तीच आर्यन खानच्या चौकशीच्या बातमीने

कॉर्ड्रीला क्रुझवर दोन तारखेला ड्रग्ज पार्टी झाली.. या पार्टीवर एनसीबीने रेड मारली आणि याच रेडमध्ये आर्यन शाहरुख खान सहभागी आल्याची बातमी समोर आली आणि अवघ्या देशभर आर्यन खान चर्चेत आला..

सुरुवातीला फक्त आर्यन खान, कॉर्डीला क्रुझ आणि एनसीबीचा सहभाग असणाऱ्या या हायप्रोफाईल प्रकऱणाने जसा जसा तीन ऑक्टोबरपासून सरकणाऱ्या सेकंद काट्याने दर क्षणाला वेगळं रुप पाहिले.. रुप आर्यन खानचे.. रुप एनसीबीचे आणि हो त्याच वेळी वेग घेतलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे..

आर्यन खानच्या एका केसच्या निमित्ताने आर्थर रोड जेलमध्ये किंवा कोर्टात जे न्यायप्रविष्ठ प्रकरण सुरु होते त्याच्याही पल्याड मीडियासमोर एक एक नाट्य रंगत होते. शाहरुख खानने आपल्या आय़ुष्यात जेवढा संघर्ष पाहून प्रसिद्धी मिळवली त्याच्या कैकपटीने आर्यनने अवघ्या पंचवीस दिवसांत या सगळ्या नाट्यामुळे आपली ओळख मिळवलीय. NDPSच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या आर्यन खानमुळे कदाचित खान कुटुंब शांत असेल म्हणा.. पण त्याला अटक करणाऱ्या समीर वानखेडे परिवारात आता याक्षणाला वादळांमागून वादळ धडकत गेली.. आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसांनतर आर्यनची जेल बाहेर येण्याची आशा मावळत गेली. 

आर्यन खानच्या सुटकेसाठी अॅडव्होकेट मानेशिंदे, अॅडव्होकेट देसाईपासून ते मुकूल रोहतगीपर्यंत सगळ्यांनी बचावाची संधी मांडली. अटकेत सापडलेल्या आर्यनला बचावाची कुठलीच संधी न देण्याची NCB प्रत्येक क्षणाला तयारी करत होती. पण कोर्टाच्या भिंतीवर एक वाक्य असते. बेल इज रुल, अँड जेल इज एक्सेपशन... bail is rule and jail is exception

आज आर्यनला जामीन मंजूर झालाय. आता प्रतिक्रियांचा पाऊस पडेल... तारखांमागून तारखेला आर्यन हजर राहील.. पण या 25 दिवसात निर्माण झालेले संशयाचे वादळ कोणाला आणखी नव्या वादळांकडे सरकवणार एवढं मात्र नक्की..

Comments