फुडची कार्यावळ

गोव्याच्या निवडणूकीत जेवढी मजा असते तेवढी कुठल्याच निवडणूकीत नसते. प्रचार आणि निकाल याचा जसा संबंध नसतो तसाच निकाल आणि सत्ता यांचाही संबंध नसतोच म्हणा !


गोव्याचा विधानसभेचा निकाल मागच्या वेळेला भाजप दिल्लीत सत्तेत असतानाही काँग्रेसच्या बाजूने होता. पण सत्तेत बसला तो जनमताचा कौल असे म्हणणे हे मविआचे गिफ्ट आहे त्यामुळे सब घोडे 12 टक्के.


राहता राहिला प्रश्न गोव्याचा.. बाबुश मोंसेरातसाठी कोण उत्पल मनोहर परीकर हा प्रश्न विचारणारे केवळ धन्यच असू शकतात. त्यातही धन्य तर शिवसेना आहे, काँग्रेसने युती नाही केली म्हणून आदळआपट करणं जबरदस्तीचा कहर आहे. राष्ट्रवादीला कोण सोबत नाही म्हणून त्यांचे पाय आपटणे सुरु आहे. अरे तुमच्याशी युती कोणी का करावी ? महाराष्ट्राचे प्रादेशिक पक्ष म्हणून बांदा क्रॉस करून पुढे जाता येत नाही यात राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि भाजपाची चूक काय ? प्रादेशिक पक्ष त्यांनी का पोसायचे ? प्रादेशिक पक्ष म्हणजे काय हे शिकायचे असेल तर आप आणि टीएमसी कडून ट्युशन लावून शिका !


मुळात गोव्याचा आणि कर्नाटकचा निकाल हा निवडून आलेला आणि सत्तेत बसलेला वेगळा असतो. यात कीव वाटते ती सोयीस्कर भूमिका आणि आयाराम स्वागतासाठी लाळ गळवणाऱ्या वरिष्ठ नेत्यांची.  विधानसभेसाठी इथे कोणाचा कोण खासदार होतो आणि एका आमदारकीच्या तिकिटासाठी बापाचा फोटो घेऊन बसलेल्याला घराणेशाहीवर काकीचा पुतण्या खडे बोल सुनावतो. प्रचंड प्रादेशिक अस्मिता असणाऱ्या गोव्यात राजकीय संघर्ष मात्र टेकू दिलेलाच असतो.. पक्ष आणि राज्य घडवणाऱ्या नेत्याचे सरण पेटत असताना सत्ताबदलाची चर्चा करणारे महाभागाचे राजकारण पाहण्यासाठी खूप मोठे दगडाचे काळीज लागते.


आणि तसही इथल्या निवडणुकीत प्रचारात मत मागायला "24 तास बीफ देऊ" हे आश्वासन देणारे तरी कुठे परधर्मीय असतात ?

Comments