वाळूच्या महालावरचा बुलडोझर


ही जी पांढऱ्या कागदावरची काळी शाई असते ना ती हिरव्या निळ्या पांढऱ्या शाईच्या नोटाना अजिबात किंमत देत नाही हेच खरे ! Hindenburg रिपोर्टने शेअर बाजारातल्या एका प्रमुख गुंतवणूकदाराच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह फार मोठे बनलंय , अर्थात देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा आता काहीच परिणाम होणार नाहीय.. पण ज्यां कंपन्यांनी त्यात गुंतवणूक केलीय त्यांचे भविष्य काय ? आकडे फुगवून जर रिपोर्ट आले असतील आणि त्यावर देशातील एका मोठ्या आर्थिक विश्वसनीय कॉर्पोरेशननी कर्ज दिले असेल तर काय ?

ती एक कॉर्पोरेशन म्हणजे देशासाठी किती महत्वाची आहे यापेक्षा त्यात देशाने केलेली गुंतवणूक म्हणजे केवळ पैसा नाहीय तर ती भविष्य निर्वाह ही एक जगण्याची आशा आहे.  मागच्या तीन दिवसांतल्या सातत्याने आदळत असलेल्या बातम्यांने अर्थक्षेत्र जरासे हलले आहे पण राजकारण ढवळून गेलंय.. यात ज्या राजकीय पक्षाला मुख्य फटका बसणार आहे ते तर चकार शब्दाने बोलत नाही आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना यावर राजकारण करायचे आहे त्यांनाही बोलायचे नाहीय..

आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रिपोर्टवर विश्वास ठेवू नये या राष्ट्रवाद प्रमाण गृहीतकावर डोळे झाकून विश्वास ठेवला तरी मनापासून एकच इच्छा आहे की या सगळ्या पडझडीचा त्या कॉर्पोरेशनवर तसूभरही फरक पडू देत नको. लक्षात घ्या सत्तेवर जे बसले आहेत त्यांनाही देश चालवायचा आहे. ते काय करतायत त्यावर आपल्याला माहीत नसताना मी टीका करत नाही. पण ज्या कॉर्पोरेशनवर जर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील त्याच्या प्रवक्त्याने बोलायला हवे..मुळात तशी वेळच न येवो ही इच्छा, पण यावर कुणीही बाबा चिठ्ठी वाचणार नाही की मी एक बोट दुसऱ्या बोटावर ठेवून अमंगल घडणार असेल तर टळणारही नाही.. फक्त ज्याचा पैसा त्याला परत मिळू दे हीच प्रामाणिक इच्छा !

(हिंडेनबर्गची ओळख शॉर्ट सेलर आहेत, ते काहीही ठरवत नाहीत, अर्थात पुन्हा बाजाराने ठरवलं तर कोसळलेल्याला पुन्हा बाजीगर बनवतील म्हणा !

Comments