गोष्ट छोटी दीड मिनिटांची !

कोकण रेल्वेच्या त्या दीड मिनिटांवर आता उत्तर मिळेल का ? घटना घडून चार पाच दिवस गेल्यानंतर आता वेगाने घडामोडी घडतायत. इथं एक गोष्ट समजून घेतली  पाहिजे. कुठल्याही नेत्यावर त्याच्या वकुबावर अविश्वासाचा हा प्रश्नच नाहीय. हा प्रश्न फक्त तिकिटात जो काळाबाजार झालाय तो मान्य करा आणि त्यावरच बोला यासाठी ही प्रश्नचिन्ह आहेत

पुढच्या काही दिवसात खूप सारे पर्याय मिळतील, पण ते दीड मिनिटांचे उत्तर मिळेल ही आशा अंधुक वाटतेय. रेल्वे म्हणेल वेळ गेली आता आम्ही काय करणार ?

कोण म्हणतेय वेळ संपलीय?? वेळ तर आता भरलीय !
तुम्ही कधीही भेटा, फक्त माझं दोन ओळींचे निवेदन घेऊन जा.. तुम्हाला वाटतय ना, हा कालाबाजार नाही, चला मान्य.. आता फक्त एकच सरकारी काम कराल का ? सगळा बाजार उठेल !

साधं सोपं काम आहे, 

18 सप्टेंबर 2023 ला कोकणकन्याचे जे दीड मिनिटात सगळं रिझर्व्हेशन फुल्ल झालंय ना, त्या 18 तारखेच्या सर्वच कन्फर्म तिकीटांचा चार्ट असेल ना, तो 18 सप्टेंबर च्या ऐवजी आजच जाहीर करा !

बघूया तरी किती मिळतात खरी नावे !! की एकाच नावावर अनेक बोग्या ?

जमेल का ?

Comments