#बेवतन


गाणं लुपमध्ये लावून अचानक मेसेज आपल्यावर गाणं पॉझ व्हावं अगदी तसाच आजचा अलविदा होता.. ही गोष्ट एका माणसाची नाहीय.. साधारणपणे 80च्या दशकापासून पासून आज 2024 पर्यँत सुरू असलेली आणि गाणं म्हणजे शांत स्वर अशी शिकवणारी गोष्ट 'बेवतन' झालीय. आता ती जहन बनलीय !

ऊपर मेरा नाम लिखा है 
अंदर ये पैगाम लिखा है 
ओ परदेस को जाने वाले 
लौट के फिर ना आने वाले

चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आयी है चिट्ठी आई है, वतन से चिट्ठी आयी है

हे गाणे ऐकून आता कदाचित संजय दत्त सोडून सगळेच रडत असतील.. कारण आता नाम चा काळ नसला तर प्रत्येकजण मनातल्या मनात बेवतन असतोच ना.. आज या मुंबईच्या कित्येक बार मध्ये आज फक्त पंकज उदासला ऐकायला म्हणून दारु प्यायला कितीजण बसले असतील त्याची गणना नकोच ! पण कुणाच्या तरी स्वरात आपले शब्द शोधणे , आणि ते तीन दशक शोधणे ही गोष्टच मुळात बेधुंद आहे..

त्या नामच्या कॅसेटपासून  माझ्या पिढीतल्या स्टोलन मूव्हमेंटच्या कॅसेट वाल्या काळापर्यंत ते तसंच ओघवतं राहीले हीच पंकज उदास नावाची गोष्ट आहे.  चिट्ठी आई है ला ऐकून ऐकून किती काळ झालाय ना, त्यातला थोडा कमी पण तेवढाच बेधुंद काळ हा और आहिस्ता किजीए बाते हे गुणगुण्यात गेलंय..

पंकज उदासची प्ले लिस्ट मोठी आहे. त्यांची गाणी स्पीकरवर ओरडायची नव्हती. टेपला हळू आवाज शिकवणार होती, आणि रिव्हाइण्ड बटनाला "आणि एकदा रे" म्हणत परत परत प्ले करायला लावणारी होती. पंकज उदासच्या जाण्याने खूप दुःख झालेली जी पिढी आहे ती फार काही बोलणारी नसेल.. पण आज बोलेल स्वतःशी.. त्यांचा पंकज उदास कुणीच नव्हता पण तो आवाज होता न फुटणाऱ्या आवाजाचा !

आता  पंकज उदासच्या त्याच मोजक्या शब्दात आपले सगळे आवाज ऐकत राहतील आणि त्यांच्याच भाषेत "त्या उरलेल्या लव्हपेग मध्ये आपली ग्लास भरत राहतील, आयुष्यभर.. त्याला आठवत, त्याला ऐकत" बेवतनात फिरत!

आईये बंद कर ले दरवाजे

रात सपने चुरा ना ले जाये

कोई झोंका हवा का आवारा

दिल की बातों को उड़ा ना ले जाये, 
ना ले जाये

और आहिस्ता कीजिये बातें

धड़कनें कोई सुन रहा होगा

#श्रद्धांजली

Comments