अवैध मासेमारीवर मंत्री नितेश राणे यांची कडक भूमिका, अवैध मासेमारीवर उद्यापासून ड्रोनची करडी नजर...

कोकण किनारपट्टीवर वाढत्या अवैध मच्छीमारीविरोधात राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी कडक पाऊले उचलत आपल्या 100 दिवसाच्या मास्टरप्लॅनला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून
9 जानेवारी रोजी आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय,मित्तल टॉवर,नरिमन पॉइंट येथे सकाळी 10 वाजता ड्रोन यंत्रणांचे उदघाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी श्री अंकुश शिंदे (पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा),श्री रामास्वामी एन (सचिव,कृषी व पदुम विभाग मुंबई),श्री पंकज कुमार (आयुक्त मत्स्यव्यवसाय) व अश्विनी पाटील(पोलीस उपायुक्त सागरी सुरक्षा)हे उपस्थीत राहणार आहेत.

याचवेळी सात जिल्ह्यातील 9 किनाऱ्यांवरून ड्रोन प्रणालीचे प्रात्यक्षिक एकाचवेळी केले जाणार आहे.मत्स्य आयुक्त कार्यालयातून स्क्रीन वरून मंत्री महोदय याची पाहणी करतील. यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर राज्याच्या 720 किलोमिटर लांबीच्या सागरी किनाऱ्यावरून राज्याच्या 12 मैल सागरी हद्दीपर्यंत बेकायदा मासेमारी करणाऱ्या अवैध नौकांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. अशा अनाधिकृत नौकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ड्रोन वेब सोल्युशनस स्ट्रिमिंगचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.त्यामुळे अवैध मासेमारीला चाप बसणार आहे. ड्रोन यंत्रणेमुळे राज्यातील सागरीक्षेत्र हे कॅमेऱ्याच्या नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे अवैध मासेमारीला आळा घालणे शक्य होणार आहे .

Comments